लिंगदाळ, नांदुरा, गोताळा व मेथी या भागात वादळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

लिंगदाळ, नांदुरा, गोताळा व मेथी या भागात वादळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
प्रशासनातर्फे पाहणी व प्राथमिक अहवालाचे काम चालू..
वादळग्रस्त भागास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट. त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश.
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील लिंगदाळ, गोताळा व नांदुरा बुद्रुक, मेथी, रोकडा सावरगाव येथे वादळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे .या ठिकाणीही झाडे उन्मळून पडले आहेत व आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आहे.अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव गाव येथेही वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे. मोठे झाडे उन्मळून पडले आहेत. आणि घरावरची पत्रे उडाली आहेत. आंब्याच्या झाडावरील कैऱ्या वादळामुळे पडल्या आहेत. वादळामध्ये प्रचंड वेग असल्यामुळे शेतामधील पिकांचे हे नुकसान झाले आहे.
अहमदपूर नांदुरा व पुढे चाकूर जाणारा रस्ता रस्त्यावर झाडे पडल्यामुळे बराच काळ बंद होता. तालुक्यातील गोताळा, नांदुरा ,येथे केशर आंब्याच्या बागा आहेत.या केशर आंब्याच्या बागांनाही या वादळवाऱ्याचा तडाका बसला आहे. लिंगदाळ, नांदुरा गावात लाईटचे पोल मोडले पडले आहेत व घरावरील पत्रे सुद्धा उडाली आहेत.दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी आलेल्या या अवकाळी पावसाने रोकडा सावरगाव नांदुरा, लिंगदाळ मेथी या भागात शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान केले आहे. तालुक्यात किनगाव परिसरातील असलेल्या फळबागांचे नुकसान या वादळी पावसामुळे झाले आहे. या वादळाची माहिती करतात राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व त्यांच्यासोबत सर्व प्रशासनाने या भागास भेट दिली आहे व सहकार मंत्र्यांनी पुढील कार्यवाही त्वरित करण्याचे आदेश दिले आहेत.
आज प्रशासनाचे अधिकारी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांनी या भागात जाऊन पाहणी केली असून नुकसानीचे नोंद घेऊन प्राथमिक अहवाल तयार करण्याचे काम चालू आहे. वाऱ्याचा जोर एवढा होता की काहीजणाच्या शेतातील सोलार चे पॅनल सुद्धा उखडून पडले. लिंगदाळ येथे शेतकऱ्याच्या शेतातील अखे शेडच उडून गेले. रोकडा सावरगाव गावात घरावरील पत्रे ही उडाले व शेत शिवारातील नारळाची आंब्याची झाडे कोलमडून पडली.
गोताळा येथे शेतकरी रमेश कोदळे, लिंगदाळचे धनंजय येलगट्टे, नांदुराचे देशमुख यांच्या आंब्या च्या बागेला चांगलाच फटका बसला असून 50, 60 टक्क्याहून अधिक आंबे वादळामुळे गळून खाली पडले आहेत. अहमदपूर तालुक्यातील नांदुरा येथे आप्पाराव देशमुख यांचेही केशर आंब्याची मोठी बाग आहे या बागेलाही या वादळाचा चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातील पाटोदा, किनगाव या परिसराला या वादळी पावसामुळे फळबागांना फटका बसला आहे.
या वादळी पावसाची माहिती प्रशासनाला मिळतात प्रशासनातर्फे आज सर्व ठिकाणी भेटी देण्यात येत आहेत. या वादळग्रस्त भागास महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख व त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी मनीषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे , प्रशिक्षणार्थी आयपीएस सागर खरडे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी सरपंच गंगाधर गुरमे, संदिपान गुरुमे, नांदुरा , येथील गोशाळा,लिंगदाळ ,रोकडा सावरगाव, पाटोदा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रामुख्याने फळबागा म्हणजे अंबा पिकाचे नुकसान झाले आहे याची पाहणी व प्राथमिक अहवाल कृषी सहाय्यक, तलाठी, व ग्रामसेवक प्रत्यक्ष भेटी देऊन तयार करत आहेत. प्राथमिक अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष पंचनामे करण्यात येतील. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नांदोरा, लिंगदाळ या गावांना भेटी दिल्या व प्रशासनास पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले व शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. प्रशासनातर्फे नुकसानीची माहिती घेऊन प्रत्यक्ष नुकसान ग्रस्त भागात जाऊन पाहणी करून प्राथमिक अहवाल तयार करण्यात येत आहे.
कोट
दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात एक वादळाचा बेल्ट तयार होऊन लिंगदाळ, मेथी, गोताळा, नांदुरा, अवकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मतदारसंघातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील आंबा फळबाग व विद्युत सोलार तसेच आजूबाजूच्या परिसरातील विद्युत खांब मोठ्या प्रमाणात पडले होते. तात्काळ महावितरणशी संपर्क साधून विद्युत खांब बसवून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश दिले. नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. तसेच प्रशासकीय स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शासन व आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
सहकार मंत्री मा. बाबासाहेब पाटील.