शिरुर ताजबंदला सोसाट्याच्या वार्यासह जोरदार पाऊस ;आंबा फळाला मोठा झटका

शिरुर ताजबंदला सोसाट्याच्या वार्यासह जोरदार पाऊस ;आंबा फळाला मोठा झटका
शिरुर ताजबंद (गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंदला सायंकाळी ५.२० वाजता सोसाट्याच्या वार्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली.आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शेतकर्यांत चर्चा चिंचेझाड रस्त्यावर पडले.
सायंकाळी ५.२० आलेल्या जोरदार सोसाट्या वारा व सोबत आलेल्या पावसाने शिरुर ताजंबद येथे आलेल्या भाजी विक्रेत्या तारांबळ उडाली .पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने पालेभाज्या कवडीमोल किमंतीत विक्री ईतर फळभाज्या ही कवडी मोल किमंतीत शेतकर्यांना विकावे लागत असल्याचै पाहण्यास मिळाले वांगी दहा रुपये पेक्षा कमी दराने विक्री तर टोमॅटो दहा रुपयाला दोन टोपली विकली जात होती .टरबुज ,खरबुजाकडे ग्राहकाने पाठ फिरवली.
जोराच्या वार्यामुळे घरावरील पत्र्याचै सेड ही उडाले. जोराच्या वार्यामुळे आंबा फळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची चर्चा शेतकर्यांतून ऐकायला मिळाले.माकणी ता.अहमदपूर येथील गावाला पाणीपुरवठा करणार्या फिल्टरचे विद्युत पोल पडले.आजनी ता.अहमदपूर येथील शिरुर ताजबंद आजनी रोडवर राम सारोळे यांच्या शेतीतील भले मोठे चिंचेचे झाड उखडून पडल्याने शिरुर ताजबंद आजनी, सलगरा वाहतुक बंद झाली.