अवकाळी पावसामुळे विजेचे पोल, तुटलेल्या तारा यांची लवकर दुरुस्ती करावी – गणेश हाके

अवकाळी पावसामुळे विजेचे पोल, तुटलेल्या तारा यांची लवकर दुरुस्ती करावी - गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी अवकाळी पाऊस, वादळ, वारा यामुळे अनेक ठिकाणी तारा तुटले आहेत त्यामुळे वीज पुरवठात खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय होताना दिसून येत आहे सध्या शेतीमध्ये रब्बी पिकांना पाण्याची आवश्यकता आहे.
अगोदरच जंगली प्राणी, अवकाळी पाऊस, तसेच नपिकी यामुळे शेतकरी हवालधील झाला आहे. पेरणीकरिता घेतलेले कर्ज सुद्धा फिटत नाही. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करून लवकर विजेचे खांब व तुटलेल्या तारा दुरुस्त करून द्याव्यात अशी मागणी भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांनी यांनी निवेदनाद्वारे महावितरण पारेषण व निर्मिती मंडळाचे स्वतंत्र अध्यक्ष विश्वास पाठक यांच्याकडे केली.
मागणी करताच विश्वाची पाठक यांनी संबंधित कार्यालयास ताबडतोब सूचना करून विजेची झालेली तोडमोड दुरुस्त करून विजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या.