150 भांड्याच्या किटचे लांजी येथे वाटप

150 भांड्याच्या किटचे लांजी येथे वाटप
अहमदपूर (गोविंद काळे) : दि 01 एप्रिल रोजी मौजे लांजी ता.अहमदपूर येथे बांधकाम कामगार विभागाकडून कामगाराला मिळालेल्या 150 भांड्याच्या किटच्या वाटपाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा अहमदपूर च्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब जाधव, प्रमुख पाहुणे गणेशजी हाके, माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, ज्ञानोबा बडगिरे,डॉ.सिद्धार्थकुमार सूर्यवंशी,उपसभापती बालाजी गुट्टे, सरपंच कालिदास कदम, चेअरमन हरिभाऊ कदम, चेअरमन व्यंकटराव मुंडे, उपसरपंच अब्बास पटेल आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये हा लोक उपयोगी व भावस्पर्शी कार्यक्रम पार पडला.
बांधकाम कामगार विभागाकडून येणाऱ्या सुविधा लाभाची सविस्तर माहिती माजी आ.बब्रुवान खंदाडे यांनी दिली.
कामगारांना लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे यांनी पपरिश्रम घेतली व कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले त्यांचे सर्व नेत्यांनी व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून आभार व्यक्त केले व मान्यवरील रामानंद मुंडे यांच्या भावी वाटचालीस अनेक उत्तम शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला खालील सन्माननीय नेते व ग्रामस्थ व मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी उपस्थित होत्या, सूत्रचंचलन गोपाळ गुटे व राजू चिलकरवार यांनी केले तर आभार गजानन अनंतवाळ यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.