एलसीबीची उत्कृष्ट कामगिरी !! गांजा विक्रेताला होणार जेलची वारी !! गांजाच्या बियासह साडेनऊ किलो गांजा पोलिसांनी आणला शासन दरबारी !!

एलसीबीची उत्कृष्ट कामगिरी !! गांजा विक्रेताला होणार जेलची वारी !! गांजाच्या बियासह साडेनऊ किलो गांजा पोलिसांनी आणला शासन दरबारी !!
लातूर (अँड. एल.पी.उगीले) : नशेसाठी गांजाचा वापर करणारे नशेडी सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सहजासहजी लक्षात न येता नसेल राहण्याचा आनंद घेण्यासाठी गांजाचा वापर केला जातो. काही ठिकाणी या गांजावर वेगळी रासायनिक प्रक्रिया करून त्याचा वास कमी करून तो पुरवठा करणाऱ्या ही काही एजन्सी आहेत. त्या एजन्सींना देखील अशा पद्धतीचा गांजा पुरवठा करणे किंवा गांजाची लागवड करण्यासाठी त्याचे बियाणे पुरवठा करणे असाही उद्देश ठेवून काही लोक गांजा सोबत बियाणेही विकतात. तशाच पद्धतीचा गांजा आणि बियाणे विकण्याचा व्यवसाय करणाऱ्या ठिकाणावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या मोठ्या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या विशेष पथकाचे जिल्हाभर कौतुक केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 5 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, अण्णाभाऊ साठे नगर,चाकूर येथे एक व्यक्ती त्याचे राहते घरामध्ये स्वताच्या आर्थिक फायदयासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगुन त्याची चोरटी विक्री करीत आहे. सदरची माहिती वरीष्ठांना कळवून शासकीय पंचसह अण्णाभाऊ साठे नगर, चाकूर येथे 12:50 वाजता छापा मारला. तेथे इसम नामे अनिल शिवाजी सूर्यवंशी, (वय 48 वर्ष, राहणार अण्णाभाऊ साठे नगर, चाकूर जिल्हा लातूर) यास ताब्यात घेऊन त्याच्या राहते घराची झडती घेतली असता, घरात खाताच्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये बी मिश्रित नऊ किलो 565 ग्राम गांजा एक लाख 91 हजार 300 रुपयाचा मिळून आला. नमूद गांजा संदर्भाने विचारपूस केली असता त्याने सदरच्या गांजा अवैध विक्रीसाठी ओम उर्फ बाळू भगवान वाघमारे (रा. कृष्ठधाम, विवेकानंद चौक, लातूर) याचे कडून विकत घेतला असल्याचे सांगितले.
गांजाच्या नशेत साठी अनेक नशाखोर परेशान असतात, या नशाखोरांना गांजा पुरवण्यासाठी गांजाची लागवड करणारा बी बियाणे या गांजा सोबत विक्री करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. तशाच पद्धतीने या धाडीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला बी मिश्रित गांजा आढळून आला आहे. ज्याचा अर्थ असा होतो की, गांजा विक्रीसाठी तर द्यायचा दयचा त्या त्या गांजाची लागवड करण्यासाठी बी बियाणे देऊन शेतामध्ये पुन्हा गांजाची लागवड करायची अशी व्यवस्था या विक्रेत्यांनी करून ठेवली होती.
नमूद दोन्ही आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे चाकूर येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी अनिल सूर्यवंशी याला सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. दुसरा आरोपी ओम उर्फ बाळू भगवान वाघमारे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर, सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, मनोज खोसे, नितीन कठारे, राहुल कांबळे, सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, तानाजी बरुरे,सुधीर कोळसुरे, नानासाहेब भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, रियाज सौदागर, प्रदीप चोपणे यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.