छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयालयातील डॉ. विजय जाधव यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पेटंट प्राप्त

छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयालयातील डॉ. विजय जाधव यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पेटंट प्राप्त
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विजयकुमार जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गॅस सेंसर संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पेटंट प्राप्त झाले आहे. प्रा. डॉ. विजयकुमार जाधव व त्यांचे सहकारी प्रा. डॉ. अनिल मुघटकर, प्रा. डॉ. संतोष जाधव, प्रा. डॉ. राजाराम माने माजी संचालक, इनोवेशन व इनक्युबेशन सेंटर, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड, प्रा. डॉ. श्याम गोरे, प्रा. डॉ .उमाकांत तुंबरपळे, डॉ. शोयब शेख, सौदी अरेबिया, प्रा. विजयपाल वाढवे इत्यादींनी केलेल्या या नाविन्यपूर्ण संशोधनाला नुकतेच जर्मनी या देशाने आंतरराष्ट्रीय पेटंट म्हणून मान्यता दिली आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे दुसरे पेटंट आहे. नॅनो संमिश्रपासून तयार केलेल्या नवीनतम पदार्थाचे हे गॅस सेंसर असून अमोनिया हा विषारी वायू शोधणे व त्याची तीव्रता मोजणे तसेच भविष्यातील अपघात आणि जीवित हानी टाळण्यासाठी याचा उपयोग होईल अशी माहिती डॉ. जाधव यांनी यावेळी दिली. या गॅस सेंसर चा उपयोग फर्टीलायझर इंडस्ट्री, डम्पिंग ग्राउंड, प्रयोगशाळा, सेप्टिक टॅंक, पब्लिक युरिनल्स, स्वच्छतागृहे इत्यादी ठिकाणी होऊ शकतो. भविष्यात नवीन संधीची दारे यामुळे खुली होतील अशी माहिती त्यांनी दिली. उच्च दर्जाचे संशोधन या महाविद्यालयात होत असून प्रदेशातील विद्यार्थी (यमन) येथे संशोधन करत आहेत, त्यामुळे भविष्यात छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय हे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र म्हणून नावलौकिक प्राप्त करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या यशाबद्दल स्वा.रा. ती.म. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी डी पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील,सचिव पांडुरंगराव शिंदे व सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे, सिनेट सदस्य व आय. क्यू.ए.सी. चे समन्वयक डॉ. विष्णू पवार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.