विवेक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी वाघे,तर सचिव पदी पटवारी यांची फेर निवड

विवेक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी वाघे,तर सचिव पदी पटवारी यांची फेर निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील नागलगाव येथील रुक्मिणी माता सुडे कन्या विद्यालयात विवेक शिक्षण संस्थेची सर्व साधारण सभा घेण्यात आली,या सर्वसाधारण सभेत माजी पोलीस पाटील यशवंत लक्ष्मण वाघे यांची विवेक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी तर सचिव पदी वैजनाथ पटवारी यांची फेर बिनविरोध निवड करण्यात आली.१७ सदस्यापैकी ११ सदस्य उपस्थित होते. तर ६ सदस्य अनुउपस्थित होते,सर्वसाधारण सभेत विवेक शिक्षण संस्थेची नूतन कार्यकारणीही जाहीर करण्यात आली.विवेक शिक्षण समिती कार्यकारणी उपाध्यक्ष पदी श्रीमती शशिकला गुणवंतराव शेरे,सहसचिव पदी गोविंद पुरुषोत्तम कुलकर्णी, कोषाध्यक्ष पदी चंद्रकांत शंकरराव कणकटे,सह कोषाध्यक्ष पदी सिताराम गोविंद कांबळे,सदस्य वैजनाथ धुळप्पा खड्डे, माधव रामचंद्र पाटील,गुरुनाथ हावगीराव गुडसुरे, शंकर रामराव पाटील, गुरुनाथ शामराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.