हरिश्चंद्र कुंडगीर यांना नालंदा ऑर्गनायझेशनचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर

0
हरिश्चंद्र कुंडगीर यांना नालंदा ऑर्गनायझेशनचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर

हरिश्चंद्र कुंडगीर यांना नालंदा ऑर्गनायझेशनचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर

राणीसावरगांव (गोविंद काळे) : गंगाखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली राणीसावरगाव ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी हरिश्चंद्र कुंडगीर यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे गावाच्या उभारणीमध्ये किंवा गाव समृद्धी करण्यामध्ये शास्वत उपायोजना राबवण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. त्यांचा योग्य बहुमान व्हावा त्याचा योग्य सन्मान व्हावा म्हणून गावासाठी त्यांनी जे योगदान दिलं आहे ते योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्ररत्न सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र रत्न पुरस्कार 19 एप्रिल या दिवशी पत्रकार भवन नवी पेठ पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे हरिश्चंद्र कुंडगीर यांची सदर 2025 आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार या यासाठी निवड करण्यात आली असून गंगाखेड तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे हरिश्चंद्र कुंडगीर यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे कुंडगीर यांनी केलेले काम, प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांशी असलेले संबंध आणि विकासासाठी नेहमी तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणून हरिश्चंद्र कुंडगीर यांचा उल्लेख केला जातो हरिश्चंद्र कुंडगीर यांना आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!