विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच वाचन वाढवून स्वयं अध्ययन करावे – मंजुषा लटपटे
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच वाचन वाढवून स्वयं अध्ययन करावे - मंजुषा लटपटे
अहमदपूर (गोविंद काळे) : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच अवांतर वाचन वाढवावे. स्वंय अध्ययन करावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात नीतिमूल्य संस्कार परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या रेखाताई हाके-तरडे ,प्रमुख अतिथी उपजिल्हाधिकारी मंजुषाताई लटपटे, नैतिक मूल्य संस्कार परीक्षेचे प्रांताध्यक्ष संतोष कुलकर्णी , तालुका समन्वयक प्रमोद कुलकर्णी,भगवान कुलकर्णी, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विश्वनाथ विळेगावे,डॉ.कामाक्षी पवार यांच्या सह माता पालक, शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांना स्काऊट गाईडच्या पथकाने मानवंदना देऊन औक्षण केले.
उपस्थित मान्यवरांचा ग्रंथ,शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार व नीती मूल्य संस्कार परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मेडल, शाल, पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी मंजुषाताई लटपटे पुढे बोलताना म्हणाल्या की, ध्येय मोठं ठेवा. मेहनत घ्या. अभ्यासाचे नियोजन करा असे सांगत स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी ही सखोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी संतोष कुलकर्णी यांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व विशद केले.प्राचार्या रेखाताई तरडे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशाताई रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन शारदा तिरुके यांनी तर आभार सतीश साबणे यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप मोरगे त्रिगुणा यांनी पसापसायदानाने केला.
