इनरव्हील क्लबच्या वतीने कर्करोग तपासणी व प्रतिबंधक लसीकरण

इनरव्हील क्लबच्या वतीने कर्करोग तपासणी व प्रतिबंधक लसीकरण
अहमदपूर (गोविंद काळे) : इनरव्हील क्लब व स्त्री रोग तज्ञ संघटना अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंध साठी HPV ( ह्युमन पॅपिलोमा व्हायरस तपासणी),आणि प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सर्व्हॅरिक्स ही लस कर्करोग प्रतिबंधक लस असून मुलींना वयाच्या बारा वर्षापासून लग्नापूर्वी देण्यासाठी जनजागृती करण्यात आली. त्याच प्रमाणे HPV तपासणी आणि सर्व्हॅरिक्स लसीकरण कमी दरात 15 दिवस करण्यात आले.
ह्या शिबिरात 50 महिलांची HPV तपासणी आणि 12 सर्व्हॅरिक्स लसीकरण करण्यात आले.
त्याच प्रमाणे स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी सोनो मॅमोग्राफी ही तपासणी डॉ. भाग्यश्री येलमटे व डॉ.विशाखा पलमटे यांच्याकडे अर्ध्या दरात करण्यात आली. त्यामध्ये 50 महिलांनी आपली तपासणी करुन घेतली. 12 वर्षां पुढील सर्व मुलींना लग्ना आधी सर्व्हॅरिक्स ही लस आणि वयाच्या 30 वर्षां पासून पुढे दर 5 वर्षांनी HPV तपासणी केली तर गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखला जावू शकतो.
त्याच प्रमाणे स्तनामध्ये गाठ असेल किंवा त्यासंबंधी काहीही त्रास असेल तर सोनो मॅमोग्राफी ही तपासणी करुन लवकर निदान होवून कर्करोग रोखला जावू शकतो.
कर्करोगाला घाबरण्यपेक्षा जागरूक राहणे गरजे आहे. प्रतिबंधक लसीकरण करावे असे सर्व स्त्रीरोगतज्ञांचे सांगणे आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.अंजली उगिले, डॉ. मीनाक्षी करकनाळे, डॉ.वर्षा भोसले, डॉ.पल्लवी कदम, डॉ.निता गुणाले, डॉ.नेहा पाटील, डॉ. पल्लवी कराड, डॉ. पद्मजा बेरळकर,ललिता किनगावकर यांनी विशेष परिश्रम व मार्गदर्शक केले.
यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा विजया भुसारे, सचिव रेखा बालुरे, संगीता खंडागळे, सुनीता गुणाले, प्राचार्या सारिका उगिले, शिल्पा हंगरगे,कांचन काडवादे, संगीता मेनकुदळे सह मान्यवर उपस्थित होते. प्रोजेक्ट प्रमुख म्हणून शितल मालू यांनी काम पाहिले.