म.ज्योतिबा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 150 जणांचे रक्तदान सम्राट मित्र मंडळाचा उपक्रम

म.ज्योतिबा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 150 जणांचे रक्तदान सम्राट मित्र मंडळाचा उपक्रम
अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा ज्योतिबा फूले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अहमदपूर येथील सम्राट मित्र मंडळ व बौद्ध नगर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 150 जणांनी रक्तदान करून अभिवादन केले.
या शिबिराचे उद्घाटन माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते गणेशदादा हाक्के पाटील हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहूणे आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे,माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे,माजी नगरसेवक शेषेराव ससाणे,शेख याखूबभाई,महेंद्र ससाणे, भाजयुमो तालूकाध्यक्ष रामानंद मूंडे, रिपाई नेते अरूणभाऊ वाघंबर, गफारखान पठाण,रहिमखान पठाण,मोहम्मद पठाण, नौशाद पठाण,शेख शेखूभाई,सैय्यद अजगरभाई, भगवानराव ससाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबीर चालले. अहमदपूर शहर व परिसरातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून प्रत्यक्षात रक्तदान केले.
या शिबीरास सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर खर्डे,पोलीस निरीक्षक बी.डी.भूसनूर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे,तालुका कृषीअधिकारी बावगे पाटील, नगरसेवक रहिमखान पठाण, अण्णाराव सूर्यवंशी, गोविंदराव गिरी,पत्रकार भिमराव कांबळे, बालाजी मस्के,शिवाजीराव गायकवाड, विष्णू पोले, संतोष भसमपुरे,दिनकर मद्देवार, त्रीशरण मोहगावकर, गणेश मूंडे,अजय भालेराव आदींनी रक्तदान शिबीरास भेटी देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष युवक नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन जनकल्याणासाठी समर्पित होते.त्यामुळे समाजाने त्यांचीच प्रेरणा घेऊन समाजाच्या सक्षम आरोग्यासाठी अशा रक्तदान शिबिराची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दयानंद वाघमारे आणि केले तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले.
सदरचे शिबिर यशस्वी करण्यासाठी अजय भालेराव, सचिन बानाटे, आकाश पवार, रोहन जाधव, राजकुमार गायकवाड, मंगेश गायकवाड, सोनू कांबळे, श्रीकांत गायकवाड, दिनेश तिगोटे, समाधान गायकवाड, योगेश पोतले, वैभव वाघमारे, शिवाजी राठोड, प्रशांत जाभाडे, शिवाजीराव भालेराव, दिलीप भालेराव, डॉ.बालाजी थीट्टे,प्रदिप जाभाडे, प्रदिप कांबळे, प्रभाष कसादे,तसेच बौद्ध नगर भीम जयंती मंडळाचे अध्यक्ष विकास ससाणे,ऊपाध्यक्ष रितेश रायभोळे,सुनिल ससाने, विशाल कदम, राजधानी सोनकांबळे, सुशिल कदम सावळाराम बनसोडे, राजु गुळवे, दिलीप सोनकांबळे, संविधान कदम,आकाश वाघमारे,संतोष सोनकांबळे, राहुल वाघमारे, निलेश रायभोळे, विठ्ठल ससाने, अभय गुळवे, अभय गायकवाड, जैनु सोनकांबळे, जय गुळवे, प्रकाश लांडगे,अभिजित सोनकांबळे, रोहन गायकवाड, अभिजित सोनकांबळे आदींनी पुढाकार घेतला.