महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस 3 कोटी 26 लाख निव्वळ नफा

0
महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस 3 कोटी 26 लाख निव्वळ नफा

महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस 3 कोटी 26 लाख निव्वळ नफामहेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस 3 कोटी 26 लाख निव्वळ नफा

अहमदपूर (गोविंद काळे) : महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अहमदपूर ने प्रगतीचा आलेख सातत्याने चढता ठेवला आहे. मार्च 2025 अखेर बँकेचे भाग भांडवल 1629 कोटी, ठेवी 416 कोटी, कर्जवाटप 247 कोटी,सीडी रेशो 59.40% तसेच निव्वळ एनपीए शून्य टक्का आहे. बँकेला मार्च 2025 अखेर 3 कोटी 27 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेने 663 कोटी रुपयाचा व्यवसायाचा पल्ला गाठला आहे.
या यशात बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री माननीय श्री बाळासाहेबजी जाधव साहेब,बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब,सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष श्री निवृत्तीराव कांबळे साहेब ,बँकेचे व्यवस्थापन मंडळ, सर्व सन्माननीय संचालक ,बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक श्री सिद्राम रंदाळे ,प्रभारी व्यवस्थापक श्री प्रशांत मांडवकर, बँकेचे शाखाव्यवस्थापक,अधिकारी,कर्मचारी, आय टी अधिकारी,कर्मचारी, पिग्मी एजंट, बँकेचे सभासद, ठेवीदार,खातेदार यांचा सिंहाचा वाटा आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया व सहकार खात्याचे तंतोतंत नियमांचे पालन करून बँकेने बँकेचे ठेवीदार, सभासद व खातेदार यांची मने जिंकली आहेत.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणी भागवण्यासाठी बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कर्मचाऱ्यांना पाच टक्के दरात वाहन कर्ज, बांधकाम कर्ज सहा टक्के, तसेच कॅश क्रेडिट सुविधा, सुट्ट्यांचा पगार ,दर वर्षी एन्क्रीमेंट ,बोनस देऊन कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या संचालक मंडळाने नेहमीच सहानुभूती दाखवून प्रोत्साहित केले आहे. बँकेचा चालू आर्थिक वर्षात पुणे शहरात शाखा चालू झाली आहे. लवकरच औपचारिक उद्घाटन होणार आहे.बँकिंग व्यवसाया सोबतच सामाजिक बांधिलकी बँकेने जोपासली आहे.आपल्या बँकेने अंबाजोगाई रोड,लातूर या शाखेत फ्रँकिंगची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.
या यशासाठी बँकेचे सभासद, खातेदार ,हितचिंतक, नौकर दार व व्यापारी या सर्वांचे बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक श्री सिद्राम रंदाळे व प्रभारी व्यवस्थापक श्री प्रशांत मांडवकर यांनी ऋण व्यक्त करून आभार मानले आहेत.
त्याचबरोबर नवीन आर्थिक वर्षात बँकेची याहीपेक्षा अधिक चांगल्या सुविधा बँकेकडून सभासदांना प्राप्त व्हावीत अशा प्रकार च्या अपेक्षा व्यक्त करून मा.नामदार श्री बाबासाहेब जी पाटील साहेब यांनी बँकेला शुभेच्छा देऊन सर्व सभासद,कर्मचारी, पिग्मी एजंट यांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!