डॉ.कस्तुरी पाटील यांचा सत्कार

डॉ.कस्तुरी पाटील यांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा सेवा संघाचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंदराव शेळके सर यांची कन्या डॉ.कस्तुरी गोविंदराव शेळके पाटील यांचा अंधोरी येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अंधोरी येथे डॉ. खोडवे, डॉ.देवकते व डॉ.कस्तुरी पाटील यांनी संयुक्त रीत्या मोफत आरोग्यनिदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. अंधोरी येथे शिबीर आयोजित केल्याबद्दल डॉ. कस्तुरी पाटील, डॉ.खोडवे, डॉ.देवकते यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदरील शिबिरात जवळपास 140 रूग्नांची मोफत तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी अंधोरीचे जेष्ठ नागरिक विठ्ठलराव उजनकर, माजी सरपंच सतिषराव क्षीरसागर, माजी सरपंच ज्ञानोबा ब्रिंगणे, डॉ.पंचाबराव देशमुख शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय उजनकर, अंकुश पाटील, वसंत कदम ,संतोष कल्याणे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.