माहिती अधिकारातून माहिती देण्यास टाळाटाळ

माहिती अधिकारातून माहिती देण्यास टाळाटाळ
जळकोट (प्रतिनिधी) : भ्रष्टाचार करणाऱ्यांवर वचक निर्माण व्हावा यासाठी माहिती अधिकार कायदा तयार करण्यात आला; मात्र या अधिकाराचा वापर करणाऱ्या नागरिकांनाच अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. असाच एक प्रकार जळकोट तालुक्यातील चिंचोली व माळहिप्परगा येथे घडला आहे.
माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली असता ते देण्याचे दूरच, अधिकारी आपल्याला मानसिक त्रास देण्याचा आरोप दयानंद स्वामी केला आहे. याबाबत जळकोट तालुक्यातील अपीलीय अधिकारी जयवंत कोनाले व शिवकांत पटवारी दयानंद स्वामी यांना पत्र पाठवून 4 एप्रिल 2025 रोजी पंचायत समिती कार्यालय येथे दुपारी 1:30 वाजता सुनावणीसाठी बोलावले.
या दिवशी सुनावणीसाठी न आल्यास एकतर्फी निर्णय घेण्यात येईल, असेही कोनाडे यांनी तक्रारदाराला पत्राद्वारे सूचित केले. प्रवासातील अडचणींवर मात करून, तसेच तब्येतीची पर्वा न करता तक्रारदार दयानंद स्वामी हे लातूरहून पंचायत समिती कार्यालयात पोहोचले; मात्र मोठा प्रवास करत कार्यालयात पोहोचल्यानंतर अपीलीय अधिकारी कोनाले व पटवारी शासकीय कामासाठी लातूर ला गेल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. हे उत्तर ऐकून लातूरहून धावपळ करत सुनावणीसाठी पोहोचलेल्या तक्रारदार दयानंद स्वामी यांना धक्काच बसला.
पंचायत समिती कार्यालय जळकोट येथे बोलावले गेले, तसेच हजर राहिलो नाही, तर एकतर्फी सुनावणी घेतली जाईल असेही सूचित करण्यात आले.
सुनावणीसाठी बोलावून गैरहजर
अपीलीय अधिकाऱ्यांनी मला बोलावून व स्वत: मात्र गैरहजर राहून माझे शारीरिक व मानसिक नुकसान केले आहे. संबंधित अपीलीय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीह केली आहे.