प्रभारी सहा पोलीस अधिक्षक सागर खर्डे यांची दमदार कामगिरी दोन अवैद्य वाळूच्या हायवा वर कार्यवाही; ४० लाख ५० हजाराच्या मुद्देमालासह ४ जणांवर गुन्हा दाखल

प्रभारी सहा पोलीस अधिक्षक सागर खर्डे यांची दमदार कामगिरी दोन अवैद्य वाळूच्या हायवा वर कार्यवाही; ४० लाख ५० हजाराच्या मुद्देमालासह ४ जणांवर गुन्हा दाखल
अहमदपूर ( गोविंद काळे) : तालुक्यातील अवैद्य धंद्याला आळा घालण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी प्रभारी पोलीस अधिक्षक सागर खर्डे यांना मिळालेल्या गुप्त माहीती नुसार अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैद्य वाळू वाहतुक करणारे २ हायवा टिप्पर पकडून ४० लाख ५० हजार हजाराच्या मुद्देमालासह ४ जणांवर अहमदपूर पोलीसात दि ०९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की लातुर जिल्ह्यातील अवैद्य धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी प्रभारी सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर खर्डे अहमदपूर यांनी वेगवेगळ्या पथकाची निर्मिती करुन ९ एप्रिल रोजी गस्तीवर पाठवले असता गोपनीय माहीतीच्या आधारे दि ९ एप्रिल रोजी पहाटे ०६ : ०० ते ०६ : ४० वाजण्याच्या सुमारास अवघ्या तीस मिनिटाच्या आत नांदेड लातुर राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी फाटा येथे हायवा क्र एम.एच २४ ए यु ६६९३ व एम एच ०१ सि. व्ही ६६६१ असे दोन अवैद्य वाळू भरलेले हायवा पकडण्यात आले असुन अवैद्य वाळू व हायवा सहीत ४० लाख ५o हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
पोलीस उपनिरिक्षक आनंद श्रीमंगल व सहाय्यक पोलीस निरिक्षक राजेश आलीवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १. दत्तात्रय गोपीनाथ सुर्यवंशी वय ३५ वर्ष चालक रा नवकुंड झरी ता चाकुर २. गणपत लिंबाजी होळकर रा चिलखा ता अहमदपूर ३. प्रल्हाद वाघमारे वय ३८ वर्ष रा लाळी( बु ) ता जळकोट ४. किशन दगडू कदम रा चिलखा ता अहमदपूर यांच्यावर अहमदपूर पोलीसात भारतीय न्याय संहिता बि.एन.एस गुरन नं २४३, २४४ / २०२५ कलम ३०३ ( २ ), ३ ( ५ ) सहकलम पर्यावरण अधिनियम १५ नुसार दि ९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी प्रक्षिक्षणार्थी सहा पोलीस अधिक्षक सागर खर्डे यांनी मागील एक ते दिड महीण्यापासुन अवैद्य वाळु सह गुटख्यावर कार्यवाही करुन करोडोंचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यांच्या या कार्यवाही मुळे तालुक्यातील सर्व स्तरातुन कौतुक होत असुन अवैद्य धंदेवाल्यांचे मात्र धाबे दणाणलेले दिसुन येत आहे.
अहमदपूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंदे यांना लगाम घालण्यासाठी सुजाण जनतेने ९७६२१६८७८० या हॉट्अप नंबर वर संपर्क करावा किंवा संदेश पाठवावा आपले नाव गुपीत ठेवण्यात येईल असे आवाहन प्रभारी प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर खर्डे यांनी केले आहे.