25 वर्षीय महीलेचा विनयभंग करून लाथाबुक्यांनी मारहाण व जिवे मारण्याची धमकी; एका विरूध्द गुन्हा दाखल

25 वर्षीय महीलेचा विनयभंग करून लाथाबुक्यांनी मारहाण व जिवे मारण्याची धमकी; एका विरूध्द गुन्हा दाखल
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील काजळ हिप्परगा येथील एका 25 वर्षीय महिलेचा गावातीलच एका इसमाने वाईट हेतुने हात धरून विनयभंग करून लाथाबुक्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली पिडीत महीलेनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीसात सदरील इसमाविरूध्द दि 08 एप्रिल रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा येथील एका पिडीत 25 वर्षीय महीलेने पोलीस स्टेशन अहमदपूर येथे हजर होऊन फिर्याद दिली आहे कि मी काजळ हिप्परगा ता अहमदपूर या ठिकाणची राहणारी असुन मला पती, दोन मूले असा परिवार आहे माझे पती मजूरी करून कूटुंबाची उपजिवीका भागवतात. दि.08.04.2025 रोजी दूपारी 08.00 वाजण्याचे सुमारास मी रामचंद्र आरदवाड रा काजळ हिप्परगा याचे घरी मी भांडे घासण्याकरीता गेले असता आमचे गावातील इसम अजय मोतीराम चामवाड रा. काजळ हिप्परगा हा इसम तेथे आला व विनाकारण मला मारहाण करण्यास सुरूवात केली तेव्हा रामचंद्र आरदवाड रा काजळ हिप्परगा यांनी आमचे भांडण सोडवा सोडव केली व त्याला तेथून जाण्यास सांगीतले त्यानंतर मी भांडे घासून माझे घरी गेले असता तो इसम माझे घरी कोणी नसल्याचे पाहून दूपारी अंदाजे 01.00 वाजण्याचे सुमारास घरी आला व सकाळी झालेल्या भांडणाची खुरापत काढून मला मारहाण केली व वाइट हेतूने माझा हात पकडला मी आरडा करत असल्याने त्यांनी माझे तोंड दाबून गप्प बस नाही तर तूला खतम करून टाकतो म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली व तो निघून गेला. तरी मला वाइट उददेशाने हाताला पकडून माझा विनयभंग करून लाथबुकयाने मारहाण करून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणारे अजय मोतीराम चामवाड रा काजळ हिप्परगा ता अहमदपूर याचे विरूध्द योग्य ती कार्यवाही करावी अशी फिर्याद दिली असुन महीलेने दिलेल्या फिर्यादीवरून अजय मोतीराम चामवाड रा काजळ हिप्परगा ता अहमदपूर यांच्या विरूद्ध अहमदपूर पोलीसात दि O8 एप्रिल रोजी गुरनं 242 / 2O25 बी एन एस 2023 कलम 74 ,333,115 (2 )352,351 ( 2 ) 351( 3 ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.