राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत किलबिलचा संघ तृतीय

राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत किलबिलचा संघ तृतीय
अहमदपूर (गोविंद काळे) : दिनांक 5 व 6 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजी नगर येथील मैदानावर नुकत्याच राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदरील स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल जवळगा शाळेतील 19 वर्षे वयोगटात मुलींचा संघ सहभागी झाला होता. त्यात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. या संघात कु अपेक्षा बिराजदार, वैष्णवी सूर्यवंशी, स्वराली कोदळे, दिव्या श्रीरामे,श्रेया लुंगारे, श्रुती केंद्रे आदी खेळाडूंचा समावेश होता. यांच्या या यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक अर्शद शेख, निलेश बन यांचे शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उपप्राचार्य धर्मसिंग शिराळे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.