ग्रामीण रुग्णालय अहमदपूर यांचा राजस्तरावर गौरव

ग्रामीण रुग्णालय अहमदपूर यांचा राजस्तरावर गौरव
अहमदपूर (गोविंद काळे) : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून गामिण रुग्णालय अहमदपूर या संस्थेने महाराष्ट्रामध्ये ग्रामीण रुग्णालय स्तरावर मोठ्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. प्रकाश आबिटकर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सचिव, निपुण विनायक, वीरेंद्र सिंग, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त, अमगोथू श्री रंगा नायक आरोग्य संचालक डॉ.नितीन आंबेडकर यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. बाळासाहेब नागरगोजे, डॉ रामलिंग शेटे,राजू वाघमारे, जयश्री पडिले, मंगल नाकपुर्णे, सुनीता
राजे यांनी पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराचे श्रेय हे ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना जाते असे वैद्यकीय अधीक्षक, डॉ बाळासाहेब नागरगोजे म्हणाले.