अहमदपूर पोलीस ठाण्यात बेवारस वाहनाचा लिलाव

अहमदपूर पोलीस ठाण्यात बेवारस वाहनाचा लिलाव
अहमदपूर (गोविंद काळे) : पोलीस ठाण्याच्या वतीने ३० बेवारस वाहनांचा लिलाव शुक्रवारी १३ एप्रिल रोजी रविवारी सकाळी ११ : ०० वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती अहमदपूर पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा प्रभारी पोलीस निरिक्षक सागर खर्डे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस वाहने अहमदपूर पोलीस ठाण्यात पडून आहेत. या वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर, चेसी नंबर, इंजिन नंबर यांच्या माहितीसह वर्तमानपत्रातून, मालकांना पत्र पाठवूनही व यापूर्वी आवाहन करून देखील बेवारस वाहनांचा ताबा घेण्यासाठी कोणीही आलेले नाही. लिलाव होण्यापूर्वी मूळ मालक कागदपत्र घेऊन आल्यास त्यांना वाहन दिले जाईल. लिलावानंतर कुणाचीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. या लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या भंगार विक्रेते दुकानदारांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी १००० रुपये अनामत रक्कम शॉप अॅक्ट लायसन्स, आधार कार्ड व कागदपत्रांसह अहमदपूर पोलीस ठाण्याच्या आवारात दि १३ एप्रिल रोजी रविवारी सकाळी ११ : ०० वाजता हजर राहावे.
जमादार एम.टि राठोड मो.नं ९१५६६ ५८५६२ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा प्रभारी पोलीस निरिक्षक सागर यांनी केले आहे.