बाल वैज्ञानिक परीक्षेत संत ज्ञानेश्वर च्या अमृताला सिल्वर मेडल

0
बाल वैज्ञानिक परीक्षेत संत ज्ञानेश्वर च्या अमृताला सिल्वर मेडल

बाल वैज्ञानिक परीक्षेत संत ज्ञानेश्वर च्या अमृताला सिल्वर मेडल

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाची सहावी वर्गातील विद्यार्थिनी अमृता जयपद्म वजीर हिने डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत सिल्वर मेडल पटकावले आहे.
या स्पर्धेत पहिल्या फेरीत एकूण 33 विद्यार्थी पात्र झाले होते. त्यापैकी अमृता वजीर,आर्या दुधाटे,मयूर उप्पलवाड हे तीन विद्यार्थी दुसऱ्या फेरीत पोहचले. त्यापैकी अमृता वजीर ने तिसऱ्या व चौथ्या फेरीत ही यश मिळवून रौप्य पदक पटकावले आहे. तिचा मुबंईत डॉ.अनिल काकोडकर व डॉ.विनया जंगले यांच्या हस्ते सिल्वर मेडल देऊन सन्मान करण्यात आला.
सदरील परीक्षेचे मार्गदर्शन प्राजक्ता भोसले व वैष्णवी शिंगडे या शिक्षकांनी केले होते.
या यशाबद्दल श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गणेश दादा हाके पाटील, संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके, मुख्याध्यापिका आशा रोडगे, माध्यमिक मुख्याध्यापिका मीना तोवर सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!