आय. पि.एस अधिकारी सागर खर्डे यांची उत्कृष्ट कामगिरी ; गुटख्यासह 2 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त

0
आय. पि.एस अधिकारी सागर खर्डे यांची उत्कृष्ट कामगिरी ; गुटख्यासह 2 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त

आय. पि.एस अधिकारी सागर खर्डे यांची उत्कृष्ट कामगिरी ; गुटख्यासह 2 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर( गोविंद काळे) : तालुक्यातील अवैद्य धंद्याना आळा घालण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा प्रभारी पोलीस निरिक्षक सागर खर्डे यांनी विविध पथकांची निर्मिती केली असुन अहमदपूर तालुक्यातील मोरेवाडी पाटी येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्यावर कार्यवाही करून गुटख्या सह 2 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन अहमदपूर पोलीसात एका विरुध्द दि 13 एप्रिल रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याविषयी सविस्तर माहीती, अशी की लातुर जिल्ह्यातील अवैद्य धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधिक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी प्रभारी पोलीस निरिक्षक तथा सहाय्यक पोलीस अधिक्षक सागर खर्डे अहमदपूर यांनी वेगवेगळ्या पथकाची निर्मिती केली असुन पोहेकॉ तानाजी आरदवाड ,पोहेकॉ गंगाधर चपडे , पोकॉ विशाल सारूळे पोकॉ पद्माकर पांचाळ आदींचे एक पथक गस्तीवर असताना गोपीनीय माहीतीच्या आधारे दि 12 एप्रिल रोजी रात्री 08.30 वाजता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा अहमदपूर तालुक्यातील मोरेवाडी पाटी येथे चोरच्या पद्धतीने विक्रि व वाहतुक करत असताना
गुटखा अन्न पदार्थ विमल पान मसाला व व्ही 1 तंबाखू किंमत अंदाजे 2 लाख 18 हजार 400 रूपये एक पांढऱ्या रंगाची टाटा इंडीगो कार क्रमांक एम.एच. 12 के. जे. 1022 असलेले जुने वाहन असा एकूण किंमत अंदाजे 2 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
पोहेकॉ तानाजी आरदवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोटया ऊर्फ सुदर्शन पाटील रा माळेगाव ता लोहा जि नांदेड याच्या विरूद्ध अहमदपूर पोलीसात दि 13 एप्रिल रोजी गुरन नंबर 256/2025 कलम 123,223,274,275, बीएनएस सहकलम 59 अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास आय.पि.एस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरिक्षक स्मिता जाधव ह्या करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!