अहमदपूरच्या मराठवाडा साहित्य परिषदेची तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी सत्यनारायण काळे, कार्यवाह पदी प्राध्यापक द मा माने यांची निवड

0
अहमदपूरच्या मराठवाडा साहित्य परिषदेची तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी सत्यनारायण काळे, कार्यवाह पदी प्राध्यापक द मा माने यांची निवड

अहमदपूरच्या मराठवाडा साहित्य परिषदेची तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी सत्यनारायण काळे, कार्यवाह पदी प्राध्यापक द मा माने यांची निवडअहमदपूरच्या मराठवाडा साहित्य परिषदेची तालुका कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी सत्यनारायण काळे, कार्यवाह पदी प्राध्यापक द मा माने यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संस्कृती मंगल कार्यालयात मराठवाडा साहित्य परिषदेच्या सर्व सदस्यांची व्यापक बैठक केंद्रीय कार्यकारणी चे निमंत्रित सदस्य मोहीब कादरी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन तीत अहमदपूर शाखेची नूतन कार्यकारणी बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण काळे यांची उपाध्यक्षपदी राम तत्तापुरे आणि महेंद्र खंडागळे या दोघांची तर कार्यवाह पदी प्रा. द मा माने, सहकार्यवाह पदी बालाजी मुंडे, कोषाध्यक्ष जिलानी शेख यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून रंजना गायकवाड, सुनंदा कुलकर्णी, भागवत येणगे, प्राचार्य एन. एस. पाटील, दीपक बेले यांची तर स्वीकृत सदस्य म्हणून प्रा. डॉ. नानासाहेब सूर्यवंशी, प्रा. डॉ. अनिल मुंडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेल्या साहित्यिक मोहीब कादरी, मराठवाडा साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या प्राचार्य वसंत बिराजदार, कवी बालाजी मुंडे, कवी रंजना गायकवाड, एस सी ई आर टी ला कथासंग्रहाची निवड झाल्याबद्दल मिळाल्याबद्दल डॉक्टर कामाक्षी पवार यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या बैठकीला डॉक्टर अशोक सांगवीकर, डॉक्टर चंद्रकांत उगीले, उदयकुमार जोशी, डॉ दिलिप मुगळे,गंगाधर याचवाड, ज्ञानोबा भोसले,मीना तौर, वसंत घोगरे यांच्या सह मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!