सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल मध्ये महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता.अहमदपूर येथे काल दि. 11/04/2025 रोजी महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संचालक कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ.शिवालिका कुलदीप हाके पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये शाळेचे संचालक कुलदीप हाके पाटील महात्मा फुले यांच्या विषयी मोलाचे विचार मांडताना म्हणाले महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये मुलींना शिकवलं नसत तर आज प्रत्यक क्षेत्रात महिलांनी इतकी प्रगती केली नसती. आज देशाच्या सर्वोच्च पदावर एक महिला असण्यामागचे श्रेय सुद्धा महात्मा फुले यांचेच आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक हरिदास सर यांनी केले व सूत्रसंचालन कोईलवाड सर यांनी केले तसेच विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या विषयी भाषणे सादर केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
