डॉ.बाबासाहेबांनी मोठ्या कष्टातून संविधानाची निर्मिती केली – ना. बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, महा.राज्य

0
डॉ.बाबासाहेबांनी मोठ्या कष्टातून संविधानाची निर्मिती केली - ना. बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, महा.राज्य

डॉ.बाबासाहेबांनी मोठ्या कष्टातून संविधानाची निर्मिती केली - ना. बाबासाहेब पाटील सहकार मंत्री, महा.राज्य

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ , अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजीत १३४ वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या कार्यक्रमानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौक येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य पंचशील ध्वजारोहण ना. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे उद्घघाटक उपजिल्हाधिकारी सौ. मंजुषाताई लटपटे यांनी दीप प्रज्लवीत करून उद्घघाटन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे हे होते. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील आपल्या भाषणात म्हणाले की मी संविधानामुळेच मोठा झालो आहे मला विविध प्रकारची पदे मिळालेली आहेत व संविधानामुळेच मला प्रत्येक कामात यश मिळाले आहे आणि प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सुद्धा याचा लाभ होतो. आपण सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. ज्यामुळे लोकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतील म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टातून संविधान लिहून काढुन त्याची निर्मिती केली व त्याचा फायदा सर्व जाती धर्मातले लोक घेत आहेत या संविधानाचा प्रचार प्रसार आपण सर्वांनी करावा. असे आपल्या भाषणात ना. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य हे आपल्या भाषणात म्हणाले.
यावेळी ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नगर परिषदेमार्फत 134 संविधानाच्या प्रति पुस्तके पत्रकार आणि कांही प्रतिष्ठित लोकांना वाटप करण्यात आले.
यानंतर प्रमुख वक्ते सुजित गायकवाड सर हे आपल्या भाषणात म्हणाले की तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा प्रचार प्रसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या प्रमाणात करून 1956 साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर पाच लक्ष लोकांसमोर सर्वांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. संविधानामुळे प्रत्येक घटकातल्या व्यक्तीला याचा लाभ मिळाला आहे. आणि आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांना ओळखले जाते आणि रयतेचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. या जयंतीदिनी आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की बाबासाहेबांचे संविधान प्रत्येक लोकापर्यंत पोहोचविण्याचे काम आपण सर्वांनी करूयात असे आपल्या भाषणात सुजित गायकवाड म्हणाले.
संविधानामुळे सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय व हक्क मिळाले आपण सर्वांनी डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकृत करून त्यांना मानवंदना द्यावी असे आपल्या भाषणात प्रा. बालाजी आचार्य सर पुतळ्यासमोर दि.14 -04 – 2025 रोजी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या 134 वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभेमध्ये आपल्या भाषणात बोलत होते
प्रास्ताविक पर भाषणात सौ अंजलीताई अरुण वाघंबर आपल्या भाषणात म्हणाल्या की
बुद्ध धम्म हा शांतीचा धम्म आहे. बुद्ध धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे. या धम्मामध्ये अंधश्रद्धेला स्थान नाही. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिल्यामुळे आपण ताठ मानेने जगत आहोत संविधानाच्या ताकतीमुळे आपण विविध पदावर काम करीत आहोत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने हक्क दिले आहेत असे आपल्या प्रास्ताविक पर भाषणात सौ.अंजली अरुण वाघंबर या म्हणाल्या.
यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी,गोपीनाथ जोंधळे, सरस्वती कांबळे, अमोल कांबळे, श्याम देवकते, इत्यादी मान्यवरांनी महापुरुषांच्या जीवनावर व त्यांनी केलेल्या कार्यावर आपल्या भाषणातून आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाचे पंचशील ध्वजारोहण सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी संतोष लोमटे हे होते.तर, उद्घघाटक म्हणून उपजिल्हाधिकारी सौ. मंजुषा ताई लटपटे या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, ऍड भारत चामे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, आरपीआय जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, धनंजय जाधव, मनोहर गायकवाड, आशिष तोगरे, अमित रेडी, शिवानंद हेंगणे, गोविंद गिरी, आर.जी. कांबळे, विनय ढवळे, एम, बी, वाघमारे, वसंत डावरे, शिवाजीराव देशमुख, रहीमखा पठाण, माणिक नरवटे, तहसीलदार सौ. उज्वलाताई पांगरकर, आयपीएस अधिकारी सागर खर्डे, शिवाजीराव खांडेकर, अभय मिरकले, फुजैल जागीरदार, संभाजी कांबळे, दत्तू मामा कांबळे, शिवाजीराव पाटील, सूर्यकांत लामतुरे,अजहर बागवान, शेषराव ससाने, शेख मुसाभाई तांबोळी, इंजिनियर चिर्के, विभुते, अभिजीत बारोळे, सोलपुरे, मनीष शिरसागर, अनिल तिघोटे, डॉ. संजय वाघम्बर, अमोल कांबळे ढवळे सर, संजय माने,अहमदपूर चे तलाठी महेश गुपिले,प्रा.जितेंद्र कांबळे,डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, अशोक सोनकांबळे, श्रीकांत बनसोडे, पत्रकार शिवाजी गायकवाड, मेघराज गायकवाड, अजय भालेराव, त्रिशरण मोहगावकर, निवृत्ती कांबळे, दयानंद वाघमारे, भीमराव कांबळे, गणेश मुंडे, लंगे सर, शाहीर श्रीरंग गायकवाड, भगवान गायकवाड, रवि गायकवाड, जीवन गायकवाड, अहमद तांबोळी, अफरोज पठाण, फिरोजभाई शेख, राणी गायकवाड
रसिका बनसोडे,शकुंतला बाई बनसोडे, श्याम देवकते, सरस्वतीबाई कांबळे, पल्लवी वाघमारे, रंजना कांबळे, ज्योतीताई बनसोडे, रंजनाताई, रमाई महिला मंडळ अहमदपूर, बाबासाहेब वाघमारे, प्रकाश फुलारी, अभय मिरकले, पत्रकार शेटीबा शृंगारे, वाल्मीक कांबळे, देविदास ससाणे,विठ्ठल गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्रिशरण पंचशील सौ.अंजली वाघंबर, यांनी घेतले.
तत्पूर्वी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
134 वी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कार्यक्रम सोहळा यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक / संयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर, आदित्य वाघंबर, सचिन गायकवाड, बाबू भाई शेख, रितेश वाघम्बर, रोहन वाघमारे, करण कांबळे, शेखर तोगरे, केतन लामतुरे,झैद पठाण, आकाश व्यवहारे,, लक्ष्मण बनसोडे,नामपल्ले,आदिनी परिश्रम घेतले, सूत्रसंचालन अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केले तर आभार श्रीरंग गायकवाड यांनी सर्वांचे मानले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक / उपासिका यावेळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!