जग बदलणारा बाप माणूस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर – हिरामणी धसवाडीकर

0
जग बदलणारा बाप माणूस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर - हिरामणी धसवाडीकर

जग बदलणारा बाप माणूस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर - हिरामणी धसवाडीकर

अहमदपूर (गोविंद काळे) : जग अंधारमय युगात जगत असताना एक क्रांतीसुर्य उदयास येतो आणि त्याच्यामुळे सारं जग उजळून निघतो अगदी त्याच पद्धतीने क्रांतीसुर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं बाप माणूस उदयास आला आणि त्याच्यामुळं सारं जग बदलून निघालं असे विचार छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप अहमदपूर ने दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी योगा मैदानावर साजरी केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती महोत्सवात श्रीमान हिरामणी धसवाडीकर यांनी मांडले.
तत्पूर्वी जयंती महोत्सवाचे प्रमुख पाहुणे धर्मापुरीच्या शंकरराव गुट्टे उच्च महाविद्यालयाचे प्राध्यापक भगवान अमलापुरे आणि शिवाजीराव सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि सर्वांनी बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.पुढे हिरामणी धसवाडी कर यांनी असे सांगितले की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात गुलामीचे जीवन जगणाऱ्या कोटी कोटी जनतेमध्ये गुलामीची जाणीव करून दिली आणि त्यांच्यामध्ये नवीन पहाट निर्माण करण्याचं कार्य केलं. बाबासाहेबांना पुस्तकाची एवढी आवड होती की त्यांनी अमेरिकेतून परत येताना एक जहाज भरून पुस्तक सोबत आणली आणि ती ठेवण्यासाठी त्यांनी पुस्तकाचं संग्रहालय बांधून काढलं. अठरा अठरा तास ते अभ्यास करायचे आणि जगाचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. ही संस्कृती समाजामध्ये पुढे चालू राहिली तर समाज विनयशील आणि विद्वान होईल
राजा अशोकाच्या काळात भारतात 23 विद्यापीठ कार्यरत होती आणि आज सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भारतात १६ विविध विद्यापीठ आणि शेकडो महाविद्यालय आणि हजारो शाळा कार्यरत आहेत. जगाला ज्ञानाचा संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जगाच्या पाठीवर एकमेव व्यक्ती आहे
एखाद्या अजस्त्र किल्ल्याचं वर्णन करताना एखाद्या कोपऱ्याचं वर्णन केल्या जातं तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एखाद्या पैलूवरच लोक बोलतात पण समग्र बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलण्यासाठी तास दिवस आणि महिने निघून जातील तरीही त्यांच्या कार्याचा आढावा आपण देऊच शकणार नाहीत आशा सर्व गुणसंपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आज आपण साजरी करत आहोत असे त्यांनी सांगितले
या जयंती महोत्सवाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक गौतम वाघमारे, प्राध्यापक भगवान आमलापुरे, श्री डी एस वाघमारे, श्री शिवप्रसाद कदम भुतेवाडीकर यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला अध्यक्षीय समारोप श्री एन डी राठोड यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश वाघमारे यांनी केले तर आभार श्री प्रकाश देशपांडे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!