ठाकरे शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

ठाकरे शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
लातूर (प्रतिनिधी) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, महानगरप्रमुख सुनिल बसपुरे, युवा सेनेचे राहुल मातोळकर, विधानसभाप्रमुख एस आर चव्हाण, अल्पसंख्याक सेनेचे मुनीरभाई शेख, माजी उपजिल्हाप्रमुख शंकर रांजणकर, कामगार सेनेचे तानाजी करपुरे, शहर समन्वयक राजू कतारे, शहर संघटक दिलीप भांडेकर, शिवराज मुळावकर, योगेश सिरसाट, उपशहरप्रमुख भास्कर माने, राहुल रोडे, योगेश पाटील आदी उपस्थित होते..!