कार्य करणाऱ्या नेत्यांचीच किर्ती गायली जाते – ह.भ.प अश्विनी ताई पाटील

कार्य करणाऱ्या नेत्यांचीच किर्ती गायली जाते - ह.भ.प अश्विनी ताई पाटील
लातूर (प्रतिनिधी) : समाज भान ठेवून जे नेते सातत्याने कार्य करत असतात अशा महान नेत्याची कीर्ती होत असते. यातूनच त्यांच्या कार्याचा गोडवा सर्वत्र पसरत असतो व त्यांचे कार्य गायले जाते असे मत ह भ प अश्विनी ताई पाटील यांनी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वारकरी आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवचन मालेमध्ये व्यक्त केले तसेच संतांची शिकवण आहे भुकेल्यांना अन्न द्या गरजवंताना मदत करा, जाती द्वेष नष्ट करा निसर्गावर प्रेम करा मुक्या प्राण्यावर दया दाखवा, स्त्री पुरुष भेद समुळ नष्ट करा. मानवतावादी दृष्टिकोन जो घेऊन चालतो तो संत असतो असे भाऊ अयामी व्यक्तिमत्व म्हणजे दिलीपरावजी देशमुख आहेत असे प्रवचनामध्ये अश्विनीताई पाटील म्हणाल्या त्याचबरोबर जीवनामध्ये फक्त सेवा हीच आपल्या पुण्याची वाटेकरी असते सेवा करणे यापेक्षा मोठे पुण्य दुसरे काही नाही आणि वारकरी संप्रदायातले सगळे गुण दिलीपरावजी देशमुख यांच्यामध्ये त्यांच्या कार्यातून दिसतात म्हणून त्यांची कीर्ती आज गायली जात आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही पांडुरंग चरणी प्रार्थना करून ही प्रवचन मालिका संपन्न झाली यावेळी आयोजक वारकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. शरद देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करून अश्विनी ताई पाटील यांचे आभार मानले तसेच भावी भक्तांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घेतला.