सिंदगी ( बु ) येथील भाग्यश्री मुळे हीचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या( एम.पि.एस.सी ) परिक्षेत यश

0
सिंदगी ( बु ) येथील भाग्यश्री मुळे हीचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या( एम.पि.एस.सी ) परिक्षेत यश

सिंदगी ( बु ) येथील भाग्यश्री मुळे हीचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या( एम.पि.एस.सी ) परिक्षेत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सिंदगी(बु ) येथील सामान्य कुटुंबातील भाग्यश्री संग्राम मुळे ह्या विद्यार्थीनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( एम पी एस सी) खडतर परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असुन Commissionerate of fisheries mumbai मत्स्य व्यवसाय आयुक्तालय मुंबई या विभागात तिची निवड झाली आहे.

अहमदपूर तालुक्यातील सिंदगी (बु ) येथील सामान्य कुंटूंबात जन्म घेतलेल्या भाग्यश्री संग्राम मुळे हीचे लग्न झाले असुन तीची सासरवाडी मोरतळवाडी ता अहमदपूर ही आहे सारवाडी कडील तिचे नाव भाग्यश्री हरीशांत मोरतळे हे आहे तीने
इयत्ता १० वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण तालुक्यातील मोघा येथील परशुराम विद्यालयात तर त्यापुढील ११ वी १२ वी चे शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर येथे झाले नंतर राजश्री शाहु विद्यालय लातुर येथे बि. कॉम ची पदवी घेतली. तीच्या अभ्यासातील प्रगतीमुळे तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदावरील परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला. घरची परिस्थिती अत्यंत जेमतेमच होती, आई वडील शेती करून प्रपंच पुढे नेत होते. परिस्थितीची जाणीव असलेल्या भाग्यश्रीला अहोरात्र अभ्यासात गर्क होती. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. 2023 मध्ये तीने ही परिक्षा दिली होती
16 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या निकालात तिने हे यश संपादन केले असुन Commissionerate of fisheries mumbai मत्स्य व्यवसाय आयुक्तालय मुंबई या विभागात तिची निवड झाली आहे.
भाग्यश्रीने अत्यंत खडतर परिस्थितीत मार्गक्रमण करीत शेवटी आपल्या ध्येयाला गवसणी घातली, आजच्या अभ्यासू व गरजू विद्यार्थ्यांना तिने एक आदर्श घालून दिला आहे.आपले ध्येय निश्चित करून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास आपण इच्छित यश निश्चित प्राप्त करू शकतो, त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवावे असे आवाहन गरजू व अभ्यासू विद्यार्थांना भाग्यश्रीने केले आहे. तिच्या या यशाबद्दल तालुक्यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!