लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा व SBI पिकविमा कंपनीची चौकशी लावा

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा व SBI पिकविमा कंपनीची चौकशी लावा
लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024-25 या वर्षीचा पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष आहे. आणि काही बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना मिळाला असून त्यात मोठी तफावत दिसून येत आहे व बहुतांश शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.तरी जिल्हाधिकारी यांनी या बाबत चौकशी करावी व 2024-25 खरीप बाबत खालील माहिती मिळावी या साठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी जिल्हाधिकारी डॉ वर्षा घुगे ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
1) 2024-25 या आर्थिक वर्षाखेरीज एकूण किती शेतकऱ्यांनी पिकविमा भरला आहे. याची माहिती देणे.
2) पिकविमाचे एकूण किती लाभार्थी आहेत व त्याचा निकष काय याची यादी जाहीर करणे.
3) पिकविमा लाभार्थी व मंजूर झालेले समवेत , न मंजूर झालेले शेतकरी व न मंजुरीच्या कारणासहित माहिती शेतकऱ्यांना व प्रशासनाला पोर्टल द्वारे कळवावे.
4) झालेल्या पंचनाम्याची परत मिळवणे, बोगस पिकविमाबाबतीत पडताळणी व कार्यवाही करणे त्याचबरोबर पिकविम्यातील तफवातीबाबतीत स्पष्टीकरण देणे.
5) पिकविमा कार्यालय बंद आहे. ते चालू ठेवावे.
6) पिकविमा निकष आणि वाटपामध्ये मोठा घोटाळा आहे. पैसे देवून पंचनामे करण्यात आले आहेत. एकाच गटात शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम मोठी तफावत आहे. खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांना विमा मिळाला असून 80 टक्के शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत.
वरील या सर्व मागणीचा विचार करावा व जिल्हा पिकविमा समितीची तातडीची बैठक घेऊन पिकविमा बाबतीत चौकशी व कार्यवाही करत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा शिवसेना SBI पीकविमा कंपनी विरोधात शिवसेना स्टाईल आंदोलन करेल असे या निवेदनात म्हणले आहे.यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.