माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी घेतली पदाधिकारी नागरिकांच्या भेटी

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी घेतली पदाधिकारी नागरिकांच्या भेटी
लातूर (दयानंद स्वामी) : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज, बुधवार दि. १६ एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची भेट घेतली. त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या समजून घेतल्या, तसेच त्यांच्या निवेदनांचा आणि निमंत्रणांचा स्वीकार करून संबंधितांना तात्काळ आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे, निळकंठ पवार, श्रीकांत ठोंबरे, अमोल सोलंकर, खलील सय्यद, वसंत मणियार, प्रभात पाटील, पिंटू सुरवसे, कैलासनागुलकर, सतीश हलवाई, केतन हलवाई, प्रशांत हलवाई, डॉक्टर चंदन हलवाई, संजय होगले, नारायण पाटील, रमेश पाटील, बी. एस. पवार, प्रा. सुधीर अणवले,विष्णुदास धायगुडे, उमाकांत मस्के, मारुती झाकणे, रमेश साळुंके, मनोहर गायकवाड, गणेश झाकणे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
चौकट :
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्हा वकील
मंडळाच्या नूतन कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲडव्होकेट गणेश कांबळे
यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.