शेनी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) टप्पा 2 ची जन जागृती मशाल फेरी

शेनी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) टप्पा 2 ची जन जागृती मशाल फेरी
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शेनी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा ) टप्पा 2 ची जनजागृती मशाल फेरी काढून गावातील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी गट, गावातील ग्रामस्थ, शेतमजूर, मजूर या सर्वांना लोकसहभागीय सुक्ष्म नियोजन प्रकल्पाची संपूर्ण माहिती कृषी विभागाच्या वतीने कृषी सहाय्यक यांच्याकडून देण्यात आली.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) टप्पा 2 हे महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी समुदायांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर, आणि हवामान-लवचिक शेती तंत्रज्ञान अवलंबून, तसेच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे आहे या योजनेत मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील अनेक गावे समाविष्ट आहेत, जी शेती आणि ग्राम विकासासाठी मदत मिळवतात.
अहमदपूर तालुक्यातील शेनी येथे या योजने संदर्भात शेतकरी,महिला बचत गट, शेतकरी गट, गावातील ग्रामस्थ, शेतमजूर, मजूर या सर्वांना लोकसहभागीय सुक्ष्म नियोजन प्रकल्पाची माहिती व जनजागृती करण्यासाठी गावात नुकतीच मशाल फेरी काढण्यात आली असुन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) टप्पा 2 ची संपूर्ण माहिती कृषी विभागाच्या वतीने कृषी सहाय्यक मुरलीधर भारती व माधव बोयनर यांनी दिली.
यावेळी शेनी गावच्या सरपंच उषाबाई जायभाये उपसरपंच चंद्रकला ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ जायभाये, गोपाळ काळे,सायस फड, वसंत केंद्रे, संजय केंद्रे माणिक गुट्टे, पांडुरंग फड ,भास्कर गीते निर्गुणाबाई गीते ,कौशल्य केंद्रे,नारायण पीलवटे, पंढरी बेले ,पद्मीनबाई उत्तम फड ,रत्नबाई फड ,गणेश फड बाळू फड आदींसह ग्राम पंचायत सदस्य, ग्राम कृषी विकास समिती सदस्य, स्वयंसेवक गावातील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.