सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या कडून व्हाॅलीबाॅल संघाचा सत्कार व आयोजना बद्दल कौतुक.

0
सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या कडून व्हाॅलीबाॅल संघाचा सत्कार व आयोजना बद्दल कौतुक.

लातूर (एल.पी.उगीले) सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रेणा कारखाना व लातूर जिल्हा पासिंग व्हाॅलीबाॅल संघटना यांच्या कडून राज्यस्तरीय पुरुष व महिला व्हाॅलीबाॅल स्पर्धा १६, १७ व १८ एप्रिल या दरम्यान क्रीडा संकुल लातूर येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत मोठ्या संख्येने राज्यातील विविध भागातून स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये महिला विभागातून विजेत्या लातूर संघाने आज सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांची भेट घेतली, यावेळी विजेत्या संघाचा सत्कार करून स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या बद्दल आयोजन समितीचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते मोईजभाई शेख, आयोजन समितीचे उपाध्यक्ष सर्जेराव मोरे, दत्ता सोमवंशी समन्वयक महेश पाळणे आदींचे कौतुक केले.
याप्रसंगी माजी आ. त्र्यंबक भिसे,राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील,रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, सचिन दाताळ,विक्रम पाटील,कोच नसीर फुलारी, वैभव ठाकूर व्यवस्थापक सनी शेख,सोनू डगवाले, नागेश जोगदंड, निलेश पौळ,मुजीब सय्यद,नंदू भोसले, दैवशाला जगदाळे,कल्पना तप्पेकर, अविनाश बट्टेवार यांच्यासह महिला खेळाडू किर्ती तिवारी,निकिता खोब्रागडे, शर्मिष्ठा बानीक, पायली धार,अनन्या प्रतापसिंह, श्रुती शाॅ, अक्षता आडे,श्रीशा कांबळे,रानी साळुंके, लक्ष्मी चव्हाण, श्रावणी पवार, निकिता थिटे, रूचिका गजधाने, कार्तिका काळे यांची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!