अहमदपूर येथील गुंडाळे फॅमीली शॉपला आग ; दिड कोटीचे नुकसान झाल्याची माहीती

अहमदपूर येथील गुंडाळे फॅमीली शॉपला आग ; दिड कोटीचे नुकसान झाल्याची माहीती
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन जवळच असलेल्या नांदेड रोड वरील गुंडाळे फॅमीली शॉप या कापड दुकानाला दि २३ एप्रिल रोजी रात्री अचानक लागलेल्या आगीत दुकानातील कापड, सिलिंग, फर्निचर, कॅम्प्युटर , प्रिंटर आदी सामान जळून खाक झाले असुन अंदाजे दिड कोटींचे नुकसान झाल्याची माहीती विद्या गुंडाळे यांनी अहमदपूर पोलीस स्टेशनला दिली असुन पोलीसांनी सदरील घटनेची दि २४ एप्रिल रोजी स्टेशन डायरीला नोंद घेतली आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन जवळच असलेल्या नांदेड रोड वरील गुंडाळे फॅमिली शॉप कापड दुकानाला दि २३ एप्रिल रोजी अंदाजे रात्री ११:०० ते ११: ३० अचानक लागलेल्या आगीत कापड, सिलींग, लायटींग, फर्नीचर, कॅम्प्युटर व प्रिंटर जळून अंदाजे दिड कोटी रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती विद्या विजयकुमार गुंडाळे यांनी अहमदपूर पोलीस स्टेशन ला माहीती दिली असुन दिलेल्या माहीतीच्या आधारे अहमदपूर पोलीसांनी स्टेशन डायरीला दि.२४ एप्रिल रोजी नोंद घेतली आहे
सदरील आगीची बातमी समजताच अहमदपूर व लोहा येथील नगर पालीका अग्निशामक दल तसेच शासकीय ग्रामीण रूग्णालयाच्या रुग्णवाही केला देखील पाचाराण करण्यात आले होते अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली असल्यामुळे मोठा अनर्थ टळला
उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसिलदार उज्वला पांगरकर, नगर पालीका मुख्याधिकारी संतोष लोमटे आय. पि. एस अधिकारी सागर खर्डे, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, भाजपाचे गणेश दादा हाके, माजी मंत्री विनायकराव पाटील पत्रकार प्रा. विश्वांभर स्वामी, सुरेश डबीर आदींनी घटनास्थळी भेट दिली. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना या घटनेची माहीती मिळताच फोन द्वारे गुंडाळे यांना धिर देऊन सर्वोपतरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.