निपुत्रिक जोडप्याने टेस्ट ट्यूब बेबी प्रणालीचा उपयोग करावा – डॉ.अशोकराव सांगवीकर यांचे प्रतिपादन

निपुत्रिक जोडप्याने टेस्ट ट्यूब बेबी प्रणालीचा उपयोग करावा - डॉ.अशोकराव सांगवीकर यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या जोरावर वंधत्व निवारण करता येते. ज्या दाम्पत्यांना संतती सुख नाही. निपुत्रिक दांपत्याने टेस्ट टेस्ट ट्यूब बेबी प्रणालीचा वापर करावा असे आग्रही प्रतिपादन टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर यांनी केले.
ते लातूरच्या जी जी बिराजदार हॉस्पिटल, स्त्री व बाल रुग्णालय निर्मिती टेस्ट ट्यूब बेबी सेंटर च्या वतीने यशवंत विद्यालयात आयोजित निशुल्क वंधत्व निवारण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टागोर शिक्षण समितीच्या सहसचिव प्रा.डॉ. सुनिता चवळे लोहारे, व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अंजली उगीले, डॉक्टर ऋषिकेश पाटील, डॉक्टर मीनाक्षी करकनाळे, डॉक्टर नेहा पाटील, डॉक्टर वर्षा भोसले, डॉक्टर विशाखा पलमटे, डॉक्टर नीता गुनाले, डॉक्टर नाथराव कराड, डॉक्टर नरेंद्र जवणे, प्राचार्य गजानन शिंदे, शिबिर संयोजक डॉक्टर सुवर्णा बिराजदार, डॉक्टर पद्मसिंह बिराजदार ,डॉक्टर प्रियंका नीला यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
शिबिराचा शुभारंभ राष्ट्रसंत प.पू. डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलानाने करण्यात आला.
या शिबिरात अहमदपूर तालुका, चाकूरर तालुका, लोहा तालुका, जळकोट तालुक्यातील 55 जोडप्यांची तपासणी करून कारण मीमाणसा व समुपदेशन करण्यात आले. यावेळी डॉक्टर सुनिता चवळे, डॉक्टर अंजली उगीले, डॉक्टर वर्षा भोसले यांचे मनोगत पर भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिर संयोजक डॉक्टर सुवर्णा बिराजदार- दहिटणकर यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार डॉक्टर पद्मसिंह बिराजदार यांनी मांनले. शिविर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर ज्योती शिंदे, डॉक्टर नेहा भालेराव, डॉक्टर आएशा शेख, डॉक्टर पुनम शेख, संगम निला, गजानन निला, अशोक गायकवाड, श्रीशैलेश स्वामी, कार्तिक स्वामी यांच्यासह जी जी बिराजदार हॉस्पिटल च्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.