पर्यावरण व वृक्ष चळवळीसाठी प्रा. अनिल चवळे यांचा लातूरच्या कृषी महाविद्यालयात वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मान

0
पर्यावरण व वृक्ष चळवळीसाठी प्रा. अनिल चवळे यांचा लातूरच्या कृषी महाविद्यालयात वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मान

पर्यावरण व वृक्ष चळवळीसाठी प्रा. अनिल चवळे यांचा लातूरच्या कृषी महाविद्यालयात वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मान

अहमदपूर (गोविंद काळे) : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त लातूर येथील कृषी महाविद्यालयात पर्यावरण जनजागृतीचा महामेळावा आयोजित करण्यात आला. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती महामेळाव्याचे आयोजन कृषी महाविद्यालय लातूर, एमडीए ऍग्रो, यांच्यावतीने कृषी महाविद्यालय लातूर च्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्र मणी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीयराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर, शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ .अजय धवन, मॅनेजिंग डायरेक्टर फूड चेन इंडिया चिन्मयी देऊळगावकर, लोकसत्ताचे प्रदीप ननंदकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, डॉ. अतुल ढवन, डॉ. संतोष कांबळेआदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पर्यावरण बदल आणि येणाऱ्या आव्हाने यावर अतुल देऊळगावकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले, इंडिया फूड चेन च्या चिन्मय देऊळगावकर यांनीही सभागृह संबोधित केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे सह अधिष्ठाता डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
या कार्यक्रमात वृक्ष चळवळ आणि वृक्ष संवर्धनासाठी व शेतकऱ्यांच्या बांबू लागवड साठी कार्य करणारे अहमदपूर येथील अनिल चवळे यांच्या पर्यावरणामधील उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या त्यांच्या पुरस्काराबद्दल पुढच्या पर्यावरण व वृक्ष चळवळ क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत असून, या पुरस्कारासाठी महेंद्र खंडागळे, गंगाधर याचवाड, अनिल फुलारी, राजेंद्र कल्याणे, शिवशंकर पाटील, कपिल बिरादार, राजेसाहेब कदम, माधव वलसे, भरत ईगे, संजय गोटमवाड, प्रा सय्यद एम यु , अहमद तांबोळी
यांच्यासह अहमदपूर मधील पर्यावरण प्रेमी, रोटरीचे सर्व सन्माननीय सदस्य
यांनी अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!