अहमदपूर तालुक्याच्या शंतनु सगरने देशाची उंचावली मान

अहमदपूर तालुक्याच्या शंतनु सगरने देशाची उंचावली मान
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मोरेवाडी- चोबळी येथील शंतनु सगर ने थायलंड येथे दि. ७ ते १४ एप्रिल दरम्यान संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सहभाग नोंदवून गोल्ड मेडल पटकावून, देशाची मान उचलली आहे. यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यापूर्वी शंतनू सगरची कंबोडिया येथे आशियन गेम साठी भारताकडून निवड झाली होती. या स्पर्धेत त्याने भारताला सिल्वर मेडल मिळवून दिलेले आहे. तर राष्ट्रीय स्तरावर गोवा, उत्तराखंड येथील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. त्याचे शिक्षण एम कॉम, एमबीए पूर्ण झाले असून सध्या तो मुंबई येथे एका कंपनीमध्ये नोकरी करत आहे.
मोरेवाडी सारख्या अगदी लहान गावातील मुलाने देशासाठी गोल्ड मेडल मिळवावे ही खूप गौरवशाली बाब आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल, किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार, राजाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, वडील पद्माकर सगर, चूलते लहूकुमार सगर, अंकुश सगर, सरपंच विजयकुमार सरवदे, उपसरपंच बाळू मोघे, पांडुरंग गाठचिरले, संग्राम दामगुंडे, यासह गावातील सर्व लहान थोरांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.