मागील भांडणाच्या कारणावरून हाडोळ्ती येथे 21 वर्षीय युवकाचा खुन ; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

मागील भांडणाच्या कारणावरून हाडोळ्ती येथे 21 वर्षीय युवकाचा खुन ; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील हाडोळती येथील एका 21 वर्षीय युवकाचा मागील भांडणाच्या कारणावरून दोन जणांनी काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले असुन उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला असल्याची घटना दि 26 एप्रिल रोजी दुपारी 01.30 वाजता घडली असुन दोन जणांविरूध्द अहमदपूर पोलीसात दि 27 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील रहिवाशी असलेली फिर्यादी छाया दत्तात्र्यय सुर्यवंशी यांना पती दोन मुले एक मुलगी असा परिवार असुन पती सलुन (नावी ) काम करतात मोठा मुलगा पुणे येथे केटरींगचे काम करतो व लहान मुलगा बळीराम दत्तात्र्यय सुर्यवंशी वय 21 वर्ष हा गावातच मजुरीचे काम करतो तर मुलीचा विवाह झाला आहे.
दि 26 एप्रिल रोजी सकाळी फिर्यादी छाया सुर्यवंशी ही उमरगा येथे कापूस वेचण्यासाठी मुजुरीने गेली होती तर त्यांचा पती दत्तात्र्यय लक्ष्मण सुर्यवंशी लातुर येथे आजारपणाचे औषध आणण्या करीता गेले होते लहान मुलगा बळीराम सुर्यवशी वय 21 वर्ष हा युवक दि 26 एप्रिल रोजी दु 1.30 वा च्या सुमारास काही कामानिमीत्त गौस समद शेख याचे घरी गेला असता मागील भांडणाच्या कारणांवरून बळीराम सुर्यवंशी यास गौस समद शेख व गफुर गौस शेख रा हाडोळती ता अहमदपुर यांनी संगणमत करुन काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच बळीराम याला त्याच्या घरासमोर फेकुन दिले जखमी बळीराम यास लातुर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तो तिथेच मरण पावला.
सदरील घटनेची माहीती स्वता :हा आरोपी गौस समद शेख यांनी फोन करून मयत बळीराम यांच्या वडीलास सांगीतली असल्याची घटना घडली असुन फिर्यादी छाया सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गौस समद शेख व गफुर गौस शेख रा हाडोळती ता अहमदपुर यांच्या विरूध्द दि 27 एप्रिल रोजी अहमदपूर पोलीसात गुरनं नंबर 287/2O25 भारतीय न्याय संहीता बि.एन.एस 2O23 कलम 103( 1), 3 (5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.