स्कॉलरशिप परीक्षेत किलबिल चे घवघवीत यश….

0
स्कॉलरशिप परीक्षेत किलबिल चे घवघवीत यश….

स्कॉलरशिप परीक्षेत किलबिल चे घवघवीत यश….

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये किलबिल नॅशनल स्कूल शाळेचे इ. 5 वी वर्गाचे इंग्रजी माध्यम शिष्यवृत्ती परीक्षेत 47 विद्यार्थी पात्र झाले असून असून त्यापैकी 11 विद्यार्थ्यांनी 196 पेक्षा अधिक गुण घेऊन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. त्यांना शाळेतील स्पर्धा परीक्षा प्रमुख ज्ञानेश्वर जाधव व धनेश्वर आगलावे यांनी मार्गदर्शन केले. शाळेमध्ये दररोज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाते. त्यामध्ये स्कॉलरशिप, नवोदय, सातारा सैनिक स्कूल, ऑलंपियाड यासारख्या स्पर्धा परीक्षा इयत्ता पहिली वर्गापासून ते दहावी वर्गापर्यंत घेतल्या जातात व त्याची तयारीही तितक्याच चांगल्या प्रकारे करून घेतली जाते. या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत
01) संस्कार तेलंग 268
02) श्लोक आलापुरे 258
03) तेजस रणखांब 252
04) संस्कार वलसे 244
05) शौर्य वाघमारे 244
06) सुशांत आगलावे 238
07) रुद्र भगत 218
08) संभाजी तिडके 210
09) प्रणव काटे 208
10) आदर्श हालगरे 196
11) मानसी हंगे 196

सदरील सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धरम सिंग शिराळे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!