प्रवेशिका परीक्षेत श्रुती कांबळे महाराष्ट्रात सर्व प्रथम

प्रवेशिका परीक्षेत श्रुती कांबळे महाराष्ट्रात सर्व प्रथम
अहमदपूर ( गोविंद काळे ) : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे च्या वतीने माहे फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या प्रवेशिका परीक्षेत यशवंत विद्यालय अहमदपूर ची इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी श्रुती बापूराव कांबळे हिने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याबद्दल राष्ट्रभाषा सभा छत्रपती संभाजीनगर च्या अध्यक्षा प्रा डॉ. सौ. सुनिता ताई चवळे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थिनीला हिंदी विभागाचे प्रमुख प्रवीण मोरे, सहशिक्षक शिवरुद्र सांगवे, सचिन लांडगे, जितेंद्र कोहाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
याप्रसंगी प्राचार्य गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
नेत्र दीपक यशाबद्दल संस्थेचे सचिव डी बी लोहारे गुरूजी, अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.