उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर यांना पोलीस महासंचालक पदक पालकमंत्र्याचे हस्ते प्रधान

0
उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर यांना पोलीस महासंचालक पदक पालकमंत्र्याचे हस्ते प्रधान

उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर यांना पोलीस महासंचालक पदक पालकमंत्र्याचे हस्ते प्रधान

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मनीष कल्याणकर यांना पोलीस दलातील सक्रिय कामामुळे, गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने करून आरोपींना त्वरित अटक करणे ,कायदा व सुव्यवस्था याचे तंतोतंत पालन करणे, विविध प्रकाराच्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणे ,शातीर गुंडांना चकमकीत ठार करणे या सह इतर पोलीस प्रशासनातील महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाच्या वतीने देण्यात येणारा सन 2024 चा पोलीस महासंचालक पदक देऊन लातूरचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते दि. एक मे रोजी लातूर येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक सोयम मुंडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, सौ मनीषा कल्याणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या त्यांच्या नेत्रदीपक यशाबद्दल सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व मित्रपरिवाराने अभिनंदन आणि कौतुक करून पुढील कार्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत.

फोटो ओळी
उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांना महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाच्या वतीने देण्यात येणारा सन 2024 चा पोलीस महासंचालक पदक प्रदान करताना लातूरचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले सोबत पोलीस अधीक्षक सोयम मुंडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, सौ मनीषा कल्याणकर सह मान्यवर सोबतच्या छायाचित्रात दिसत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!