जेईई मेन्स परीक्षेत यशवंतच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदिपक यश
जेईई मेन्स परीक्षेत यशवंतच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदिपक यश
अहमदपुर (गोविंद काळे) : देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांन भरीव यश संपादन केले आहे.
जेईई (JEE) म्हणजे संयुक्त प्रवेश परीक्षा (Joint Entrance Examination), जी भारतातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केली जाते आणि ती दोन स्तरांवर घेतली जाते: जेईई मुख्य (JEE Main) आणि जेईई प्रगत (JEE Advanced).
जेईई मुख्य (JEE Main): ही परीक्षा अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये प्रवेशासाठी पहिली निवड प्रक्रिया आहे. या परीक्षेत चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी जेईई प्रगत परीक्षेसाठी पात्र ठरतात.जेईई मुख्य परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते.
सदरील परीक्षेच्या निकालात यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील कु. पाटील सृष्टी शिवशंकर (जनरल )या विद्यार्थिनींनी 98.75 पर्सेंटाइल
घेऊन उत्तीर्ण झाली. पैके श्लोक सिद्धेश्वर (इ डब्ल्यू एस)या विद्यार्थ्यांनी 90.13 व कुमारी कोल्हे साक्षी दिलीप (एससी) या विद्यार्थिनीने 62.69 पर्सेंटाइल घेऊन जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
या यशाबद्दल टागोर शिक्षण समितीचे सचिव डी बी लोहारे गुरुजी अध्यक्ष डॉ.अशोक सांगवीकर, सहसचिव डॉ. सुनिता ताई चवळे, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र पैके,प्राचार्य गजानन शिंदे, उपप्राचार्य मुजम्मिल सय्यद व सर्व प्राध्यापकांनी वरील विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
