हिंदी राष्ट्रभाषा सभा प्रवेशिका परीक्षेत श्रुती कांबळे महाराष्ट्रात प्रथम
हिंदी राष्ट्रभाषा सभा प्रवेशिका परीक्षेत श्रुती कांबळे महाराष्ट्रात प्रथम
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे द्वारा फेब्रुवारी 2025 मध्ये विविध परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातील प्रवेशिका परीक्षेत यशवंत विद्यालय अहमदपूर ची इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी श्रुती बापूराव कांबळे हिने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राष्ट्रभाषा सभा छत्रपती संभाजीनगर च्या अध्यक्षा डॉ. सौ. सुनिता ताई चवळे, शिक्षणमहर्षी डी. बी. लोहारे गुरुजी, डॉ. आशोकराव सांगवीकर यांच्या हस्ते श्रुती कांबळे हीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक उप मुख्याध्यापक पर्यवेक्षक आदींची उपस्थिती होती.बालबोधिनी 142,प्रारंभिक 186,प्रवेशिका 143,सुबोध 151,प्रबोध 145, असे एकूण 767 विद्यार्थ्यांनी वरील परीक्षेत यश संपादन केले आहे. सदरील विद्यार्थ्यांना हिंदी विभाग प्रमुख प्रवीण मोरे, जितेंद्र कोहाळे, शिवरुद्र सांगवे, सचिन लांडगे आदींचे मार्गदर्शन लाभले. वरील यशाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डॉ.अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र पैके,उपसचिव डॉ. सुनिताताई चवळे, मुख्याध्यापक गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी आदिनी कौतुक व अभिनंदन केले.
