अहमदपूर बसस्थानकात पाणपोई चे उद्घाटन
अहमदपूर बसस्थानकात पाणपोई चे उद्घाटन
अहमदपूर (गोविंद काळे) : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाची तीव्रता पाहता प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील रोकडेश्वर भजनी मंडळ व श्रीराम जानकी भवन सामाजिक सेवाभावी संस्था मारवाडी गल्ली अहमदपूरच्या वतीने व अहमदपूर एसटी आगाराच्या सहाय्याने सतत 18 वर्षापासून शहरातील गजबजलेले ठिकाण असलेले येथील बस स्थानकात पाणपोईचे उपक्रम अविरतपणे चालू आहे या पाणपोईचे उद्घाटन अहमदपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री संतोषजी लोमटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार प्रमुख श्री अमरजी पाटील हे होते प्रमुख उपस्थिती स्थानक प्रमुख चांद साहेब देशमुख,पत्रकार दिनकरजी मद्देवाड, सुरेशजी डबीर, मोहगावकर साहेब, विनोदजी भूतडा, ह भ प नितीनजी धर्माधिकारी, हेड कॉन्स्टेबल गंगाधरजी चपडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी श्रीराम जानकी भवन चे अध्यक्ष श्री राधेश्यामजी पुरोहित श्रीराम जानकी भवन चे सचिव तथा सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक श्री जुगलकिशोरजी शर्मा, रमेशजी पंचारे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्री सोमनाथजी पुणे, सुनील भूतडा, गणेश उपाध्याय, रविराज भूतडा, विजय पुरोहित, सचिन बजाज, पुरुषोत्तम भूतडा गोपाल शर्मा, दिनेश सोनी, गिरीश बाहेती, शुभम उपाध्याय, भागवत सोलीवाल, माणिकराव गुळवे, बालू मेनकुदळे यांची उपस्थिती होती.
