‘हाका वर्तमानाच्या’ या दिगंबर शिंदे हरबळकर लिखित ग्रंथाचे अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात प्रकाशन

0
'हाका वर्तमानाच्या' या दिगंबर शिंदे हरबळकर लिखित ग्रंथाचे अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात प्रकाशन

'हाका वर्तमानाच्या' या दिगंबर शिंदे हरबळकर लिखित ग्रंथाचे अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात प्रकाशन

अहमदपूर (गोविंद काळे) : लोहा तालुक्यातील हरबळ या गावचे सजग नागरिक तथा ज्येष्ठ पत्रकार दिगंबर लिंबाजीराव शिंदे यांनी लिहिलेल्या ‘ हाका वर्तमानाच्या ‘ या ग्रंथाचे प्रकाशन येथील महात्मा फुले महाविद्यालयात महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, दिगंबरराव शिंदे हे मुरब्बी व चिंतनशील वृत्तीचे पत्रकार असून काळ्यामायीवर जीव लावणारे शेतीनिष्ठ शेतकरीही आहेत. ‘ हाका वर्तमानाच्या’ या ग्रंथातून शेतीमातीचे प्रश्न मांडत, महाराष्ट्राची वैचारीक परंपराही त्यांनी डोळसपणे मांडली आहे. थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राचा आढावा या ग्रंथातून अभ्यासपूर्ण पद्धतीने घेतला आहे. तसेच सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या महागाई, व्यसनाधीनता, बेरोजगारी, पर्यावरणाची हानी, भ्रष्टाचार अशा विविध विषयांवर त्यांनी पोट तिडकेने लेखन केले आहे. वर्तमान समस्यांवर भाष्य करणारा ‘ हाका वर्तमानाच्या’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ असून, त्याची ठळक नोंद मराठी साहित्य विश्वात निश्चित घेतली जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी लेखक दिगंबर शिंदे यांनीही आपल्या लेखनाबद्दल भूमिका मांडली. महाविद्याल-याच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी शाल, ग्रंथ भेट देऊन लेखक दिगंबर शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनीही ग्रंथावर भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी मारोती कसाब यांनी केले तर सूत्रसंचालन ह.भ.प. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!