महाराष्ट्र दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा
महाराष्ट्र दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने महसूल प्रशासनाच्या वतीने मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजुषाताई लटपटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाला तहसीलदार उज्वलाताई पांगरकर, गटविकास अधिकारी संतोष माने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाचे सरचिटणीस शिवानंद हेंगणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती राव कांबळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम तत्तापूरे यांनी उपस्थितां चे आभार नायब तहसीलदार जी एल खरात यांनी मानले. या कार्यक्रमाला नायब तहशिलदार मुनवर मुजावर, संजय भोसीकर, विशाल कंचे, अशोक कांबळे, तलाठी महेश गुपीले, तलाठी प्रशांत बिराजदार यांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि कामगार प्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ध्वजारोहणाचा सोहळा यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
