ढाळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…!

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे ढाळेगाव येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठिक ९:०० वाजता नालंदा बुद्धविहार येथे पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण मोहन रंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले तर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्धांचा प्रतिमांचे पूजन किनगांव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्सेबल राहुल कांबळे व आंबेडकरी चळवळीतील विधिज्ञ रमेश गायकवाड यांनी केले. या प्रसंगी उपस्थित बौद्ध अनुयायी यांनी सामुहिक त्रिशरण व पंचशिल ग्रहन केले. दुपारच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांची “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन ” या विषयावर वर्कृत्व स्पर्धा झाली या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उत्तम भाषणे केले त्यामध्ये प्रामुख्याने कोमल केशव कांबळे या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विध्यार्थीनीच्या इंग्रजी भाषणाने सर्वांची मने जिंकली त्या बरोबरचं लहानलहान मुलांची भाषणे ही खूप सुंदर झाली. यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा. युवराज धसवाडीकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व संविधान या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. त्यासोबतच ऍड राहुल कांबळे यांनी सध्याचे सरकार देशात अराजकता निर्माण करण्याच्या हालचालींना बंधन न घालता त्याला खतपाणी घालण्याचे आणि संविधानविरोधी कृत्यांना पाठबळ देण्याचे काम करताना दिसत असल्याचे सूतोवाच केले सोबतच प्रमुख पाहुणे रिपब्लिकन सेना लातूर जिल्हाध्यक्ष राम कोरडे ,धम्मपाल गायकवाड पॅथर नेते सुप्रीय बनसोडे, प्रा.तौफीक सर ॲड. रमेश गायकवाड, ॲड. कांबळे संतोषकुमार रेड्डी आदी जणांची भाषणे झाली सायंकाळी पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महत्मा ज्योतीबा फुले, राजश्री शाहु महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक नालंदा बुध्दविहारापासून सुरु होऊन पुढे गावातील मुख्य रस्त्याने उत्साहात पार पडली या मिरवणूकीचे मुख्य आकर्षण महापुरुषांचे देखावे व संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिकृती ठरली मिरवणुकीत आकर्षक आतिषबाजी व भिमगितांवर तरुणाई बरोबरच लहान थोरांनी ठेका धरला. सार्वजनीक जयंती समितीचे अध्यक्ष्य प्रा. अशोक गुळवे यांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व संविधानांची उद्देशिका देऊन सत्कार केला तर आभार सेवानिवृत मुख्याध्यापक बळीराम कांबळे यांनी मानले शेवटच्या सत्रात शाहीर प्रेमकुमार मस्के आणि संच यांच्या सुमधुर भिमगितांनी श्रोत्यांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचशिल लेझीम संघाच्या सर्व सदस्यां बरोबरचं पांडुरंग कांबळे, विजयकुमार गुळवे, दिपक गुळवे,माधव गुळवे, अमरदिप कांबळे, गोपाळ गुळवे, भिमराव कांबळे, बबलु गुळवे, बाबुराव गुळवे, दिक्षानंद कांबळे, सखाराम कांबळे, धिरज कस्तूरे, विकी कस्तूरे, विकास कांबळे, समाधान कांबळे, रमेश कांबळे, शिवानंद कांबळे, राजपाल कांबळे, महादेव कांबळे, तूकाराम कांबळे, आदीनी परिश्रम घेतले.