भिमराव कदम यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

0
भिमराव कदम यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

भिमराव कदम यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा. वि.) लातूरच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार गुरु गौरव पुरस्कार सुधाकरराव नाईक मा. आश्रम शाळा तुळशीराम तांडा अहमदपूर येथील सहशिक्षक भिमराव राजाराम कदम यांना जाहीर झाला होता. त्या पुरस्काराचे वितरण दयानंद सभागृह, लातूर येथे थाटामाटात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर उन्हाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. शिवाजी कळगे, आमदार प्रविण स्वामी, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, डाएट प्राचार्या भागीरथी गिरी, मच्छिंद्र गुरमे आदींची उपस्थिती होती.

भिमराव राजाराम कदम यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यातील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एक उत्कृष्ट सहशिक्षक’ मेहनती व्यक्तिमत्व, विद्यार्थीप्रिय शिक्षक, प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य, तसेच विविध क्षेत्रात योगदान देऊन ते सतत कार्यरत असतात. त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर भाऊ गोरटे, पुंडलिक गोरटे, दत्ताभाऊ गलाले ,आदीसह सुधाकरराव नाईक मा. आश्रम शाळा तुळशीराम तांडा अहमदपूर येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!