इनरव्हील क्लब व यलम महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुखमणी वृद्धाश्रमास 1,81,101 रू.ची मदत

इनरव्हील क्लब व यलम महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुखमणी वृद्धाश्रमास 1,81,101 रू.ची मदत
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील इनरव्हील क्लब व यलम महिला मंडळाच्या वतीने सुखमणी वृद्धाश्रमाच्या बांधकामासाठी 70 महिलांनी 1,81,101 रु.निधी देण्यात आला. जुन्या इमारतीमध्ये दहा-बारा खोल्या असूनही वृद्धांना जागा कमी पडत आहे. महिला व पुरुष मिळून 30 वृद्ध आहेत. दिवसेंदिवस वृद्धांची संख्या वाढत असून जागा अपूरी पडत आहे. म्हणून लोक सहभागातून नवीन वास्तूचे बांधकाम चालू आहे. त्यासाठी इनरव्हील क्लब व येलम महिला मंडळांच्या महिलांनी एक लाख 81 हजार 101 रुपये देणगी दिली आहे. ही देणगी सुखमणी वृद्धाश्रमाच्या कर्मचारी सौ.अनुसया पांचाळ यांच्याकडे देण्यात आली. सविता भुतडा यांच्याकडून व्हीलचेअर देण्यात आली तर कांचन काडवादे यांच्याकडून कपाट देण्यात आले. याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा विजया भुसारे, सचिव रेखा बालुरे, आय एस ओ सुनंदा पदातूरे, ट्रेझरर सुरेखा उगिले, डॉ. अंजली उगिले, प्रेमा वतनी, वैशाली चामे, प्राचार्या सारिका उगिले, डॉ. ललिता किनगावकर, सुनिता गुणाले, दर्शना हेंगणे, मेघना रेड्डी, कलावती भातांब्रे, मद्रेवार, अरुणा जाधव यांची उपस्थिती होती.