ज्ञानेश्वर माऊली ट्रॅक्टर पार्ट्स अँड डेकोरेशन व ऑईल सेंटरला आग; सहा लाखाचे नुकसान

0
ज्ञानेश्वर माऊली ट्रॅक्टर पार्ट्स अँड डेकोरेशन व ऑईल सेंटरला आग; सहा लाखाचे नुकसान

ज्ञानेश्वर माऊली ट्रॅक्टर पार्ट्स अँड डेकोरेशन व ऑईल सेंटरला आग; सहा लाखाचे नुकसान

अहमदपूर (गोविंद काळे) शहरातील लातुर- नांदेड रोडवर असलेल्या ज्ञानेश्वर माऊली ट्रॅक्टर पार्ट्स अँड डेकोरेशन व ऑईल सेंटर या दुकानाला दि 4 मे रोजी रात्री अचानक लागलेला आगीत दुकानातील डि.सी फॅन , ऑईल, साईड ग्लास, फिल्टर ,चार्जर, शोचे सामान , लाईटिंग सामान आदीसह सहा लाखाचे नुकसान झाले असल्याची तक्रार पोलीसात देण्यात आली असुन दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस स्टेशन दैनंदीन डायरीला दि 5 मे रोजी नोंद घेण्यात आली आहे.

याविषयी सविस्तर माहीती अशी की, शहरातील लातुर- नांदेड रोडवर आय.टि.आय कॉलेज जवळ असलेल्या ज्ञानेश्वर माऊली ट्रॅक्टर पार्ट्स अँड डेकोरेशन व ऑईल सेंटर या दुकानाला दि 4 मे रोजी रात्री 10.30 वाजता अचानक आग लागली होती सदरील आगीची माहीती अहमदपूर नगरपालीका अग्निशामक दलास समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली तोपर्यंत या आगीत दुकानातील डी.सी फॅन 19 अंदाजे किमत 20000 रू ऑईल 900 लिटर अंदाजे किंमत 315000 रू चार्जर 60 अंदाजे किंमत 42000 रू लाइटींग सामान अंदाजे किंमत 50000 रू साईड ग्लास 150 अंदाजे किंमत शोसामान अंदाजे किंमत 60000 रू फिल्टर अंदाजे किंमत 9000 रू व इतर सामानासह अंदाजे एकूण 6,00,000 रु किंमतीचा माल जळुन नुकसान झाले असल्याची तक्रार गोविंद नारायण जायभाये वय- 46 वर्षे व्यवसाय- व्यापार रा. सुनेगाव (से) ता अहमदपूर यांनी अहमदपूर पोलीस स्टेशनला दिली असुन दिलेल्या तक्रारीवरून दि 5 मे रोजी अहमदपूर पोलीस स्टेशन दैनंदिन डायरीला नोंद घेण्यात आली आहे.
सदरील घटनेची नोंद पोलीस ठाणे अमलदार पोना राजगीरवाड यांनी घेतली असुन पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!