12 बोर्ड परीक्षेत यशवंत ज्यु. कॉलेज ची यशाची परंपरा कायम

12 बोर्ड परीक्षेत यशवंत ज्यु. कॉलेज ची यशाची परंपरा कायम
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत ज्यु. कॉलेज ची यशाची परंपरा कायम राखत विज्ञान शाखेचा 95.62 टक्के, आणि कला विभाग, 70.17 टक्के निकाल तर MCVC चा 54.54% निकाल लागला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे च्या वतीने फेब्रुवारी/ मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा आज दिनांक 05 मे 2025 रोजी ऑनलाइन निकाल लागला असून विज्ञान शाखेचा 95.62% तर कला शाखेचा 70.17% तर MCVC चा 54.54% निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतून कु. पाटील सृष्टी शिवशंकर हिने 87.17% गुण घेऊन प्रथम आली असून 80.17% गुण घेऊन पैके श्लोक सिद्धेश्वर हा द्वितीय आला आहे तर 73.33% गुण घेऊन कुमदळे मथुरा मनोज ही तृतीय आली आहे. कला शाखेतून 89 टक्के गुण घेऊन पाचंगे कृष्णा विजय हा प्रथम आला असून 76.17% गुण घेऊन भूतेवाड शंकर माणिक द्वितीय आला आहे. तर 71.83% गुण घेऊन तांबोळी रेहान इस्माईल हा तृतीय आला आहे. तर MCVCचा 54.54% निकाल लागला आहे. पाली विषयाचे दुधेवाड प्राची, गादगे श्रावणी, वाघमारे निकिता, सुरनर कुलस्वामिनी, गायकवाड सुप्रिया, भोसले नंदिनी असे एकूण 06 विद्यार्थी 100 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
सदरील यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी, अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सहसचिव डॉ. सुनिताताई चवळे, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र पैके, प्राचार्य गजानन शिंदे, उपप्राचार्य सय्यद एम.यु., विज्ञान विभाग प्रमुख प्रा. दिनेश तोंडारे, कला विभाग प्रमुख प्रा. ननीर एस. आर. यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.